रश्मिकाच्या हातात ‘ती’ गोष्ट पाहून घाबरली होती तिची आई, स्वत: रश्मिकाने सांगितला किस्सा

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आता रश्मिका मंदाना नॅशनल क्रश बनली आहे. साऊथपासून बॉलिवूडपर्यंत तिने आपल्या चाहत्यांना वेड लावले आहे. रश्मिका मंदान्नाने ‘पुष्पा: द राइज’ मधील ‘सामी सामी’ या गाण्याने सर्वांची मने लुटली आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

रश्मिका मंदान्ना ‘मिशन मजनू’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की रश्मिका मंदान्नाला कधीही अभिनेत्री व्हायचं नव्हतं. रश्मिका मंदन्नाने नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. रश्मिकाने नुकतेच ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँडमध्ये पैसे गुंतवले आहेत. म्हणजेच आता ती बिझनेसवुमनही झाली आहे.

रश्मिकाने सांगितले की, तिला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. तिला वडिलांसोबत व्यवसाय सांभाळायचा होता. रश्मिकाने सांगितले की, तिच्याकडे इतका आत्मविश्वास नव्हता की ती लोकांशी डोळ्यात डोळे घालून बोलू शकेल. त्यामुळेच शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावावा असं तिने ठरवलं होतं.

पण रश्मिका मंदान्ना हिच्या नशिबात कदाचित अभिनेत्री होणे लिहीलं होतं. सुदैवाने तिने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आणि येथूनच तिच्या अभिनयविश्वाचे मार्ग खुले झाले. रश्मिका मंदान्नाने सांगितले की, जेव्हा तिने पहिला चित्रपट साईन केला तेव्हा तिने घरातील कोणालाही याबद्दल सांगितले नव्हते. पण पहिल्याच चित्रपटासाठी दीड लाखांचा चेक मिळाल्यावर काय करावं तेच तिला समजत नव्हतं.

रश्मिका मंदान्ना यांच्या म्हणण्यानुसार, तिने घरी जाऊन तो चेक तिच्या आईला दिला. तिची आई तो चेक तिच्या हातात पाहून घाबरली. त्यानंतर रश्मिकाने तिच्या आईला सांगितले की तिला अभिनेत्री व्हायचे आहे. तिच्या या निर्णयानंतर तिचे वडील खुश होते. रश्मिका मंदान्नाने सांगितले की, एकेकाळी तिच्या वडिलांना स्वत: अभिनेता व्हायचे होते. तिला चित्रपट पाहण्याचीही आवड आहे.

अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना समजले की त्यांच्या मुलीला अभिनयात जायचे आहे तेव्हा तिचे आई वडिल खुश झाले. तिच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर, रश्मिका मंदान्ना ‘मिशन मजनू’ व्यतिरिक्त ‘गुड बाय’ आणि ‘अॅनिमल’ सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘मिशन मजनू’मध्ये रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्रा, ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर आहे. या चित्रपटांशिवाय रश्मिका ‘पुष्पा: द रुल’सह इतर दोन साऊथ चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या
काल माईक खेचला पुढे काय खेचतील सांगता येत नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला
शिंदे ऍक्शन मोडमध्ये, आदित्य ठाकरेंना धक्का देत मुंबई महापालिकेतील खास अधिकाऱ्यांची केली बदली
महाराष्ट्रात झालेली ही राजकीय खेळी कोणी आणि कधी खेळली? एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा
महाराष्ट्रात झालेली ही राजकीय खेळी कोणी आणि कधी खेळली? एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा