विधान परिषद निवडणूक पार पडली अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सहा दिवसांपासून राजकीय वर्तुळात नाट्यमय घटना घडत आहेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. बंडखोरांना पुन्हा परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रयत्न करत आहेत.
मात्र अद्याप हि शिवसेनेला बंडखोरांना परत सेनेत आणण्यात यश आलं नाहीये. विशेष बाब म्हणजे, शिंदे गट पुन्हा शिवसेनेत येईल, असं चित्र देखील आता दिसत नाहीये. यामुळे शिवसेना त्याचबरोबर ठाकरे कुटुंबीय देखील चिंतेत आहे. सध्या अनेक आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभी आहेत.
तर दुसरीकडे शिवसेनेच्या अडचणी वाढत असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत. रश्मी ठाकरे या आपल्या परीने बंडखोरांना पुन्हा परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी देखील अनेकदा आपण पाहिले आहे की, रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सभेला उपस्थित असतात.
आताही त्या सक्रिय होताना पाहायला मिळत आहे. गेल्या सहा दिवसांपासून उद्धव ठाकरे हे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी सतत संपर्क साधत आहेत. मात्र अद्याप उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांना यश आलं नाहीये. तर आता रश्मी ठाकरे बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत आहेत.
माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या पत्नींना स्वत: रश्मी ठाकरे यांनी फोन लावला आहे. याचबरोबर बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. यामुळे आता रश्मी ठाकरेंच्या प्रयत्नांना यश येणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तर आता राजकीय घडामोडी पाहता रश्मी ठाकरे देखील मैदानात उतरल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंच्या गटात होणार बंड; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याने टाकला मोठा डाव
सख्ख्या आईला सोडलं तर फडणवीसांना काय साथ देणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
जुग जुग जिओचा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले ‘इतके’ कोटी, प्रेक्षकांची पसंती
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे दारूच्या नशेत झोकांड्या घेताहेत? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य