Share

राज ठाकरेंना सभेची परवानगी मिळो न मिळो, सभा होणारच; केंद्रीय मंत्र्यांचे राज ठाकरेंबद्दल मोठे वक्तव्य

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अटक केल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (raosaheb danve support raj thackeray)

नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर भाजप नेते महाविकास आघाडीवर आक्रमक झाले आहे. भाजप नेते ठाकरे सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणं, या मताचा नाही. पण सरकारने त्यांची समजूत काढायला हवी होती असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. तसेच औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे सभा घेणारच, असा दावाही दानवे यांनी केला आहे.

राज ठाकरे औरंगाबादमध्ये एक सभा घेणार आहे. त्यावरुनही वाद निर्माण झालेला आहे. यावर आता रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंची सभा झालीच पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या चुका कोणी मांडत असेल आणि त्यांना जर रोखले जात असेल तर लोकशाहीसाठी ते घातक असेल. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळो या न मिळो. राज ठाकरे सभा घेणारच, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावरुनही वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासहार्यतेवर प्रश्ननिर्माण झाले आहे. राज्यातील कायदा व सुव्यस्था बिघडलेली आहे. मलाच नाही, तर संपूर्ण राज्याला चिंता आहे की, महाराष्ट्र बिहार होतोय की काय? सत्तेत असलेल्या सरकारमधील तिन्ही पक्ष पोलिसांना पुढे करत असून त्यांना बदनाम केलं जातंय, अशी टीकाही दानवे यांनी केली आहे.

तसेच पुण्यात किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. पण हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला नाही. पोलखोल सभेवर हल्ला झाला. तिथेही कारवाई नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारने आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या संघात मराठमोळा गोलंदाज एंट्री घेत असतानाच उडाला गोंधळ, खेळाडूने ‘ते’ ट्विट केले डिलीट
‘RRR’ आणि ‘KGF 2’ च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘यात चित्रपट कुठंय?’
एकेकाळी स्टुडिओमध्ये उलटी साफ करायची ‘ही’ अभिनेत्री, आता KGF मध्ये साकारली महत्वाची भूमिका

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now