Raosaheb danve on uddhav thackeray | राज्यात आता शिंदे आणि फडणवीसांचे सरकार स्थापन झालेले आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती करावी अशी मागणी वारंवार आमदार करत होते. पण ते युती करत नसल्यामुळे आपण बाहेर पडल्याचे बंडखोर आमदार सांगताना दिसून येतात.
तसेच महाविकास आघाडी सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना भाजप नेत्यांनी सुद्धा ऑफर दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा भाजपच्या एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आहे. ते आताही भाजपमध्ये येऊ शकतात, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये यावं की नाही यावं, हे म्हणण्यासाठी आम्ही काय आता त्यांच्या दारात जाणार नाही. त्यांना भाजपमध्ये यायचं असेल तर यावं. पण आताच्या सरकारला त्यांनी डिस्टर्ब करु नये, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर देत चिमटा सुद्धा काढला आहे.
उद्धव ठाकरेंना भाजपमध्ये यायचं असेल, तर ते येऊ शकतात. त्यांना मागच्या घटनांचा पश्चाताप झाला असेल तर ते येऊ शकतात. त्यांनी यावे, आमच्यासोबत राहावे. पण जे सरकार आता स्थापन झालेले आहे. त्याला कोणी डिस्टर्ब करु नये, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांना देत असतो. मी सुद्धा झारखंडला जाणार आहे. निर्मला सीतारामन या बारामतीमध्ये जाणार आहे. आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे चॅलेंज नाही, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
तसेच राजकारणामध्ये कोणी कायमचा मित्र नसतो आणि कोणी कायमचा शत्रू नसतो. उद्धव ठाकरे २५ वर्षे आमच्यासोबत युतीमध्ये होते. मग त्यानंतर त्यांनी युती तोडली. ज्या युतीवर राज्यातील लोकांनी विश्वास मतदान केलं होतं, त्यांना दगा देऊन उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
औरंगजेब वाईट नव्हता म्हणणाऱ्या आझमींना मनसेने झापले; थोबाड फोडल्याची आठवन करून देत म्हणाले…
सर्व भारतीय व्हॉट्सअप डीपीवर तिरंगा ठेवतीलच, पण देशाच्या जी’डीपीचे काय?
Dipak Kesarkar: १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करा; केसरकरांच्या लोटांगणानंतरही राणे आक्रमक