Share

रानू मंडल पुन्हा आली भेटीला, गायलं कच्चा बादाम गाणं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका बदाम विकणाऱ्या माणसाच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कच्चा बादाम असे या गाण्याचे नाव असून हे गाणे बंगाली आहे. सध्या गाण्यावर अनेकजण रील्स बनवत आहे. (ranu mandal kachcha badam video)

कच्चा बादाम गाण्यावर डान्स करताना अनेक सेलेब्स आणि सामान्य लोकांनी त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. कच्चा बादाम हे गाणे पश्चिम बंगालमधील बादाम विक्रेत्या भुबन बड्याकरने गायले आहे, जे खूप पसंत केले जात आहे. आता हे गाणे रानू मंडलने तिच्याच स्टाईलमध्ये गायले आहे. रानू मंडलचाही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

रानू मंडलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण गेल्या काही व्हिडिओंवर लोकांनी ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला होता, तसाच प्रतिसाद या व्हिडिओवरही लोकांनी तिला दिला आहे. रानू मंडलने हे गाणे गायल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तर काहींना हा व्हिडिओ पाहून हसू थांबत नाहीये.

https://www.instagram.com/p/CXFiXE0je1x/?utm_source=ig_embed&ig_rid=48afa229-5678-46d4-82bb-ee32c94212fe

हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी तिची खिल्ली उडवली. एका युजरने लिहिले, ओम शांती बादाम. दुसऱ्याने लिहिले, हे काय आहे? तर एकजण म्हणाला की काचा बादाम नसतात कच्चा बादाम असतात. आणखी एका युजरने लिहिले की, हिमेश रेशमिया पुन्हा तिला संधी देण्याची चुक करणार नाही. त्याचवेळी काही लोक म्हणाले की तुम्ही राहू द्या. तुमच्या बाबतीत असं होणार नाही. याशिवाय काही युजर्सनी रानू मंडलच्या व्हिडिओवर हसणारे इमोजी शेअर केले आहेत.

या व्हिडीओला आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत पण सर्वाधिक कमेंट्स रानूला ट्रोल करणाऱ्या आहेत. याआधी रानू मंडलने सहदेवचे ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. त्यावेळीही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

काही वर्षांपूर्वी रानू मंडलचा रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा है’ गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. लोकांना रानूचा आवाज खूप आवडला. यानंतर तिला एका रिऍलिटी सिंगिंग शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते जिथे गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाण्यासाठी एक गाणे दिले होते. यानंतर हिमेशसोबत रानू मंडलने ‘तेरी मेरी कहानी’ या गाण्याला आवाज दिला जो खूप लोकप्रिय झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
हृदयद्रावक! १० दिवसांपासून आई बसली होती मुलीच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ; नक्की घडलं तरी काय?
जाणून घ्या कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?, ज्याच्या आवाहनावर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला फोडला घाम
“महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी; मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now