ज्या डिसले गुरूजींना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली, ज्या डिसले गुरुजींना ग्लोबर टिचर पुरस्कार मिळाला आहे त्या व्यक्तीच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहेत. हे आरोप झाल्यानंतर दिसले गुरूजींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (dusale guruji explanation about alligations)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते ढसाढला रडले. त्यांच्या चेहऱ्यावरील दुख स्पष्ट दिसत होते. ते म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी खुप त्रास दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर खुप मानसिक त्रास झाला. जेवणावेळी कराव्या अशी मागणी केली गेली.
२५ डिसेंबरला रजेचा अर्ज केला होता. त्यावर अद्याप निर्णय नाही. फुलब्राईट हातातून जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क साधला याचा त्यांना राग आहे. राज्यपालांशी थेट संपर्क झाला, यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा वारे गुरूजी असा निरोप दिला. या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही. झोपही लागत नाही.
पुढे ते म्हणाले की, घरी सगळ्यांशी चर्चा केली आहे. बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपांमुळे व्यथित आहे. वारे सर व्हायच्या आधी बाहेर पडणार असल्याचं डिसले गुरूजी म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायची वेळ आणली आहे, असं ते म्हणाले. हे सगळं बोलताना डिसले गुरूजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळे डिसले गुरूजी व्यथित झाले आहेत.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. लोहार यांनी हे आरोप केले असून या आरोपांमुळे सगळ्यांनाचा धक्का बसला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत. अशावेळी डिसले गुरूजीच होते ज्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले होते.
डिसले गुरूजींनी शिक्षकांनी आपली गुणवत्ता कशी वाढवावी, ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरे पर्याय त्यांनी शोधून काढले. परदेशात मुलांना कशा प्रकारे शिक्षण दिले जाते याचा अभ्यास त्यांनी केला. याचाच परिणाम असा झाला की त्यांची वर्ल्ड बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
डिसले गुरूजीवर काय आरोप झालेत?
जेव्हा त्यांना अमेरिकेची स्कॉलरशिप जाहीर झाली तेव्हा त्यांनी आपल्या रजेचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिला होता. साधारण दीड महिन्यांपुर्वी त्यांनी रजा टाकली होती. पण त्यांच्या अर्जात खुप त्रुटी असल्यामुळे त्यांची रजा अजूनही मंजुर करण्यात आली नाही. अर्ज नामंजूर करण्याचं कारण अदयाप समोर आलेलं नाही.
शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या ३ वर्षांपासून डिसले गुरूजी शाळेत गैरहजर आहेत. रजा अर्जात त्रुटी असल्याने तो मंजूर झाला नाही. परदेशात स्कॉलरशिपला गेल्यानंतर शाळेचं काय करणार? आधी शाळेच्या मुलांना शिकवायला हवं ना? जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी त्यांनी काही प्रयत्न केलेत असे मला दिसले नाही, असे अनेक आरोप प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. लोहार यांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
अखिलेशने खेळला मोठा डाव; योगींविरोधात उतरवली त्यांच्याच राजकीय वारसदाराची बायको
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच केली होती हत्या, धक्कादायक कारण आले समोर
पणजीतून उमेदवारी देणार हा शब्द मी उत्पल पर्रीकरांना दिला होता; फडणवीसांच्या खुलाश्याने खळबळ
फार्म हाऊसवर कलाकारांना पुरलं जातं, शेजाऱ्याने केला गंभीर आरोप; सलमान म्हणाला, माझी राजकारणात…