Share

मुलींना ‘या’ योजने अंतर्गत मिळणार मोफत स्कूटी, जाणून घ्या काय आहे योजना आणि त्यासाठीच्या पात्रता

आज मुली प्रत्येक क्षेत्रात तरुणांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. असे कोणतेच क्षेत्र नाही, ज्यात मुली पुढे नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा मुलींना शिक्षणासाठी परवानगी नव्हती. पण आता काळ बदलला आहे. आता मुली फक्त अभ्यासतच नाही, तर नोकरीतही खांद्याला खांदा लावून चालत आहे. (rani laxmibai scheme in up)

तसेच केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत, त्या योजनांचा मुलींना थेट फायदा होत आहे. आता उत्तर प्रदेश सरकारची राणी लक्ष्मीबाई ही योजना आणली आहे, ज्याचा लाभ मुलींना लवकरच मिळणार आहे.

राणी लक्ष्मीबाई योजने अंतर्गत गुणवंत मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख होता. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी दिली जाईल. मुलींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

सरकारी महाविद्यालये, विद्यापीठांव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांचे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. योगी आदित्यनाथ सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

पात्र विद्यार्थिनींकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, बँक खाते, पासपोर्ट साईझ फोटो, जन्म दाखला, रहिवासी दाखला आणि आधार कार्ड. तसेच याशिवाय कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

या योजनेअंतर्गत सर्व गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटी खरेदी करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. स्कूटी मिळाल्यानंतर त्यांचे कॉलेजला जाणे सोपे होईल. या स्कूटी योजनेच्या माध्यमातून सरकारला मुलींना थेट शिक्षणाशी जोडता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थीनी विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिकत असायला हवी. तिला १० वी किंवा १२ वी मध्ये ७५ टक्के गुण मिळालेले असावेत. विद्यार्थीनीचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे. तसेच विद्यार्थीनीने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

महत्वाच्या बातम्या-
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच अभिनेत्री नयनताराला आली कायदेशीर नोटीस; काय गुन्हा केला तिने? वाचा…
असा डेटिंग शो पाहिला नसेल! बोलायचं नाही, पण जंगलात राहून आवडीच्या मुलीसोबत संबंध बनवू शकतात
ज्याप्रमाणे जर्मनीत झालं, तसंच भारतात वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या- अमृता फडणवीस

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now