गोव्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करण्याची घोषणा केली आहे. भाजपा नेते आणि आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Dr. Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. (rane father and son will fight directly)
भाजपने नुकतीच पर्यें मतदारसंघातून (Goa Assembly elections) प्रतापसिंह राणे यांची सून आणि विश्वजित राणे यांची पत्नी विद्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणूनच विद्या राणे आणि पर्यायाने भाजप आणि विश्वजित राणे यांना शह देण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
यामुळे गोव्याच्या राजकारणात आतापासूनच राणे पिता-पुत्राच्या लढाईची चर्चा होऊ लागली आहे. प्रतापसिंह राणे यांनी आपल्या मुलाविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला आहे. काँग्रेस पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज भरण्याची विनंती केली आहे. मी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे निवडणूक लढणार असल्याचे प्रतापसिंह राणे म्हणाले.
राजकारणात 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांनी निवृत्ती घ्यावी, अशी भावना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली होती, मात्र त्याला आव्हान देत आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे प्रतापसिंह राणे यांनी सांगितले होते. आता त्यांनी मुलाविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून राजकीय भूकंप घडवला आहे.
दरम्यान,विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याला आता राणे-पितापुत्रांच्या संघर्षात आणखी भर पडली आहे. दरम्यान सिनियर राणे यांनी आजपासून आपला प्रचारास सुरुवात केली असून लवकरच ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, शरद पवारांविषयी रोहित पवारांचं भावनिक ट्विट
असे शंभर सलमान मी दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; बिचुकले सलमानवर भडकला
महाराष्ट्र हादरला! गाडी पुलावरून कोसळून भीषण अपघात; मेडीकलच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू
साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा, अण्णा हजारेंनी केली चौकशीची मागणी