Share

ना साडी, ना लेहंगा, लग्नानंतर पुर्णपणे बदलली आलिया भट्ट, व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही बसेना विश्वास

बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सात फेरे घेऊन जीवनसाथी झाले आहेत. सर्व गॉसिप्स आणि अफवांना पूर्णविराम देत अखेर दोघांनी १४ एप्रिल रोजी ‘वास्तू अपार्टमेंट’ येथे लग्न केले. आता लग्नानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

लग्न झाल्यानंतर दोघेही रात्रभर डान्स करत होते. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ संगीत सोहळ्याचा सांगण्यात येत आहे. त्याचवेळी काही जण म्हणतात की हा लग्नानंतरच्या पार्टीचा व्हिडिओ आहे.

वास्तविक, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचा अधिकृत संगीत सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. अनेक फंक्शन्स ठेवण्यासाठी दोघांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे दोघांनी अवघ्या 10 दिवसात लग्नाची सर्व तयारी करून पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न उरकले.

घरात लग्नाचे वातावरण आहे आणि पंजाबी कुटुंबात धुमधडाक्यात लग्न होऊ नये असे कधीच होत नाही. दरम्यान, या दोघांचा एक सुंदर डान्स व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. चाहत्यांसाठी हा व्हिडीओ एका गिफ्टपेक्षा कमी नाही. या डान्स व्हिडिओमध्ये आलिया भट्ट लाल रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.

मलायका अरोराच्या छैय्या छैया गाण्यावर रणबीर कपूर आणि आलिया धमाकेदार डान्स परफॉर्मन्स देत आहेत. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार नाही.

दोघांनीही साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आता ते कोणतेही रिसेप्शन आयोजित करत नाहीत. रणबीर कपूरची आई नीतू कूपर यांनीही याबाबतची पुष्टी केली असून कसल्याही प्रकारचे रिसेप्शन होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या हनिमूनला जाणार नाहीत. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दोघे पुढच्या महिन्यात त्यांच्या हनीमूनसाठी दुबईला रवाना होऊ शकतात.

https://www.instagram.com/reel/CcW0w7hMAIr/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या
हार्दिक रॉक्स! रॉकेटच्या वेगाने बॉल फेकून संजूला केलं आऊट, स्टंपचे झाले तुकडे, थांबवावा लागला सामना, पहा व्हिडीओ
KGF 3 कधी येणार? दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, जर तुम्हा सर्व प्रेक्षकांना..
२ रुपयेची पेप्सी खात असाल तर सावधान! पेप्सीमुळे ७ चिमुकल्यांनी गमावला जीव, वाचून हादराल

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now