सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी अखेर माघार घेतली होती. आक्रमक शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्यांनी आपला प्रण मागे घेतला. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी माघार घेतली होती.
यानंतर राज्य सरकारने राणा दाम्पत्यांना अमरावतीला पोहचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली होती. पण आता राणा दाम्पत्याला अटक झाली आहे. खार पोलिसांनी कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. या अटकेनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? या चर्चेला उधाण आले आहे.
प्रवीण दरेकर यांनी मोठे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊतांनी भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे खुल्ले आव्हान देत वातावरण तापवले आहे.
राज्यात काही दिवसांपासून अनेक हिंसक आंदोलने झाली आहेत. त्यामध्ये अनेक लोकं जखमी झाली आहेत. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारला वेठीस धरले आहे. या सर्व कारणांमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधी नेते करत आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्रात तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाले होते. राणा दाम्पत्याचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक कालपासून त्यांच्या खार येथील घरासमोर ठाण मांडून बसले होते.
त्यांना डिवचण्यासाठी शिवसैनिकांनी रूग्णवाहीकाही आणली होती. अगदी 92 वर्षांच्या आज्जी देखील पहारा देण्यासाठी मातोश्रीवर आल्या होत्या. पण शिवसैनिकांचा आक्रमक पावित्रा पाहून राणा दाम्पत्यानी माघार घेतली. त्यानंतर त्यांना खार पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: धन्यवाद हा शब्दही तुमच्यासमोर छोटा पडेल, ‘KGF 2’ ला मिळालेले यश पाहून भारावून गेला यश
प्रविण दरेकर म्हणाले, एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी; छगन भुजबळ म्हणाले, ईडीचे प्रयोग…
“उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला आहे” राणा दांपत्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
भिंतीत सापडल्या १९ किलो चांदीच्या विटा अन् १० कोटींची रोकड; महाराष्ट्रात खळबळ