भारत (India) हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे येथील कित्येक नागरिक शेती (agriculture) व्यवसायावर अवलंबून आहेत. परंतु शेती करताना दुग्ध व्यवसाय (Milk business) हाताशी धरून शेतकरी चांगला आर्थिक नफा कमवू शकतात म्हणूनच शेतकरी पशुपालनाकडे जास्तीत जास्त लक्ष देतात. आज शेतीसोबत पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
शेतकरी शेती सोबत पशुपालन करूनही चांगले उत्पन्न मिळत आहेत. पशुपालन क्षेत्रातील वाढता नफा पाहून याला पशुसंवर्धन असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे पशुपालन व्यवसायातून शेतकरी नफा मिळवतात. दरम्यान सध्या शेतीतून आर्थिक नफा कमावणारे अनेक शेतकरी आहेत. पण तुम्ही कधी १०० एकर शेती आणि १०० म्हशी असणार्या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकली आहे का?
हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी येथे रामेश्वर मांडगे यांनी तब्बल १०० एकर शेती घेतली असून १०० म्हशींचा गोठा तयार केला आहे. रामेश्वर यांच्याकडे पहिल्या फक्त ३ एकर शेती आणि १ म्हैस होती. यातून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आहे. रामेश्वर रांच्या सध्या मुरा आणि जाफराबादी जातीच्या १०० म्हशी आहेत.
या १०० म्हशींसाठी रामेश्वर हे ७० ते ८० एकर जमिनीमध्ये गुरांचा चारा लावतात. यामध्ये ते गहू, बाजरी, मका, ज्वारी अशा अनेक पिकांची देखील लागवड करतात. तसेच रामेश्वर हे गुरांसाठी गहु , बाजरी, मकेचा भरडा करून गुरांना सरकी पेंड म्हणून देतात. या गुरांसाठी मोठा बंदिस्त गोठा बनवण्यात आला आहे.
शंभर मशीनच्या देखभालीसाठी सहा ते सात कामगार ठेवण्यात आले आहे. सकाळी तीन वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत हे कामगार करत असतात. सकाळी धारा काढल्यानंतर म्हशी बंदिस्त गोळ्यात ठेवल्या जातात. तर उन्हाच्या वेळेस म्हशींना थंड पाण्यात बसण्यासाठी स्विमिंग पूल बांधला आहे.
दरम्यान, दुग्ध व्यवसायातून रामेश्वर यांनी आर्थिक परिस्थिती चांगली केली आहे. रामेश्वर मांडगे यांच्यावर काही वर्षांपूर्वी गरीबीचा शिक्का लागला होता. पण आज ते शंभर एकराचे मालक आहेत. तसेच त्यांच्याकडे १०० म्हशी असुन दिवसाला ३५० ते ४०० लिटर दूध निघते. रामेश्वर हे स्वतः कामगारांच्या मदतीने रतिबाचे दूध घरोघरी पोहोचवतात.
महत्वाच्या बातम्या
आम्ही तर रामकृष्णाचे वंशज, धर्मांतरनंतरही आमचे रक्त हिंदुचेच; मुस्लिम आमदाराचे विधानसभेत जोरदार भाषण
आशेने लावला कांदा अन् झाला वांदा! १७ गोण्या कांदा विक्रीनंतर १ रुपये नफा; उत्पादन खर्चही निघेना
सोन्याबाबत सर्वात मोठी बातमी! यापुढे ‘अस’ सोनं चालणार नाही; केंद्र सरकारचा नवा नियम