सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला गळती लागली आहे. अनेकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. खुद्द उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र मैदानात उतरले आहेत.
४० आमदार फुटल्यानंतर शिवसेनेतून पदाधिकाऱ्यांच्या हाकालपट्टीचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. सुरुवातीला माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची देखील सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कोंडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत सामनामधून वृत्त प्रसारित करण्यात आलं आहे. यावर आता कोंडे यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर कोंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना कोंडे यांनी म्हंटलं आहे की, ‘शिवसेनेत खूप काम आजपर्यंत केली. मात्र केलेल्या कामांच्या खूप कमी बातम्या सामनातून प्रसारित झाल्या. मात्र मी शिंदे गटात सामील व्हायच्या आधीच हकालपट्टीची बातमी तातडीने सामनात छापुन आली, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पुढे बोलताना कोंडे म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीमध्ये वाढलेले शिवसैनिक आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याच काम आजपर्यंत त्यांनी केलं आहे. यामुळे चांगल काम करत असणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण गेलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, ’27 वर्ष जे आदेश मातोश्रीने दिले ते पाळले. मात्र एखाद्या वेळेस आपण आपला निर्णय घेतला तर काय अडचण? अजूनही हातात शिवबंधन आहे आणि ते शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल,’ असं म्हणत कोंडे भावूक झालेले पहायला मिळाले. ‘मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच काम हे खूप चांगलं होतं,’ असं देखील त्यांनी नमूद केलं.
‘माझ्या मतदार संघातील कामांना गती देण्याच काम एकनाथ शिंदे यांच्याकडून होणार आहे. माझ्या मतदार संघामधील माझ्यावर जी जबाबदारी आहे तिला न्याय देण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत असल्याच रमेश कोंडे यांनी स्पष्ट केलं. आज ते शिंदे गटात सामील झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
पूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट; धक्कादायक घटनेचे फोटो व्हायरल
विराटबद्दल प्रश्न विचारताच भडकला रोहित शर्मा, म्हणाला, त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी…
बाबा वेंगा यांची तिसरी भविष्यवाणी खरी ठरणार? ‘या’ देशामध्ये दिसले एलियन्स; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल