Share

ramdev baba : महीलांनी कपडे नाही घातले तर मला त्या जास्तच छान दिसतात; रामदेवबाबांचे अमृता फडणवीसांसमोरच वादग्रस्त विधान

amruta fadanvis baba ramdev

ramdev baba shocking statement women | योग गुरु  रामदेव बाबा हे त्यांच्या वकव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते कधी काय वक्तव्य करतील हे सांगता येत नाही. आता त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांवरुन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरातून त्यांच्यावर टीका केली आहे.

ठाणे, महाराष्ट्रातील मोफत योग प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी रामदेव यांनी महिलांच्या पेहरावावर भाष्य केले की, स्त्रिया साडीमध्ये छान दिसतात, सलवार सूटमध्ये छान दिसतात, इतकंच नाही तर माझ्या दृष्टीने बघाल तर त्यांनी काहीही नाही परिधान केलं तरी ते छानच दिसतील.

ठाण्यात पतंजली योग पीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीतर्फे आयोजित योग विज्ञान शिबिर आणि महिला परिषदेत रामदेव बोलत होते.  रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांवरून हे वक्तव्य केले त्या वेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे,  भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रामदेव यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी महिलांनी त्यांचे योग कपडे आणि साड्याही आणल्या होत्या. प्रशिक्षण शिबिरानंतर लगेचच सभा सुरू झाल्यामुळे अनेक महिलांना कपडे बदलायला वेळ मिळाला नाही आणि त्यांनी योगा सूट घालून शिबिरात हजेरी लावली.

ते पाहून रामदेव म्हणाले की, साडी नेसायला वेळ नसेल तर हरकत नाही. स्त्रिया सर्वच पोशाखात छान दिसतात आणि कपडे घातले नाहीत तर त्याहूनही छान दिसतात. यावेळी रामदेव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचेही कौतुक केले आणि लोकांनी दीर्घायुष्यासाठी अमृता फडणवीस यांच्यासारखे हसत-खेळत राहावे, असे सांगितले आहे.

तसेच यावेळी रामदेव बाबा यांनी शिंदे-फडणवीसांचे कौतूकही केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट वक्तिमत्व आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे उर्जावान व्यक्ती आहे. शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहे. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे.

महत्वाच्या बातम्या-
अभिनेता सलमान खान करणार करीष्मा कपूरसोबत लग्न? जाणून घ्या काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य
Surekha Punekar : अपुरे कपडे घालून अश्लील हावभाव करत नाचने याला लावणी म्हणत नाहीत; गौतमीवर भडकल्या सुरेखा पुणेकर
मैदानावर आले अर्जून तेंडूलकरच्या बॅटींगचे तुफान; नंतर घातक गोलंदाजी करत ठोकला टिम इंडीयात एन्ट्रीचा दावा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now