शिवसेनेला आणखी एक जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर राजीनामा देताना कदम यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदेंना समर्थन देत आहेत. त्यातच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे.
तर आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही काळापासून कदम हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांचा विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नव्हती.
तेव्हापासून ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता.
तर आता रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी जहरी टीका कदम यांनी केली.
दरम्यान, ‘आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले,’ असा आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘अरे मंत्रिपद काय घ्यायचं, मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो,’ मुख्यमंत्री शिंदेंसमोरच बंडखोर आमदाराने थोपटले दंड
सुष्मितासोबतच्या नात्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदींनी सुनावले; म्हणाले, मी अजूनही मध्यम वयात…
शिंदे सरकारची घटीका भरली? सर्वोच्च न्यायालय ‘या’ तारखेला ठरवणार शिंदे सरकारचे भवितव्य
नगरच्या पठ्ठ्याच्या ‘या’ जुगाडावर आनंद महिंद्रा सुद्धा झाले फिदा; फोल्डिंग जिना पाहून म्हणाले…