नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. ईशान्येकडील नागालँड राज्यातील विधानसभेच्या ५९ जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या (Ramdas Athawale) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नागालँडच्या ६० विधानसभा जागांवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे. या निकालांमुळे इतर राज्यातील निवडणूक निकालांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये मतमोजणी सुरू आहे.
दुसरीकडे, नागालँडमधील अनेक जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत. पहिल्यांदाच राज्याच्याबाहेर आठवले गटाचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीने वेधून घेतले आहे.
त्याचवेळी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने (एनडीपीपी) एक जागा काबीज केली आहे. तसेच २५ जागांवर आघाडी केली आहे. भाजपने दोन जागा जिंकल्या असून १२ जागांवर आघाडीवर आहे. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने ३ जागांवर आघाडी घेतली आहे.
राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने एनपीएफ, भाजप आणि एनडीडीपी प्रामुख्याने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिन्ही पक्षांनी एनडीए अंतर्गत आघाडी केली आहे. नागालँडमध्ये विरोधकांच्या जवळपास अनुपस्थितीमुळे, मुख्यमंत्री नेफियू रिओ, जे संयुक्त लोकशाही आघाडी अंतर्गत आपले सरकार चालवत आहेत.
या आघाडीत नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP), भारतीय जनता पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंट (NPF) यांचाही समावेश आहे. २०१८ च्या निवडणुकीपूर्वी एनडीपीपी आणि भाजपची युती केली होती. याशिवाय एनपीएफचे २१ आमदारही या आघाडीत सामील झाल्याने विरोधक जवळपास संपुष्टात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-






