औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलत असताना स्वामी समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवत राज्यपालांनी सर्वांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राज्यपालांना माफी मागण्याची गरज नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत, “राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे, ते तपासून पाहणं गरजेचं आहे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला आहे.” असे आठवले यांनी सर्वांना सांगितले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते दैनिकांमध्ये आले आहे, ते योग्य नाही. परंतु, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही.”
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी, “पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये जागा आम्हाला ३९ द्या आणि बाकीच्या तुम्ही घ्या. किती घ्यायचे ते पाहू पण एवढ्या नकोत. ज्या-ज्या ठिकाणी आमचे चांगले कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी आम्हाला तिकीट द्या.” असे आवाहन सुध्दा केले आहे.
दरम्यान राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. परंतु शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले होते की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”
असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते. यानंतर आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केला होता. तसेच राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविषयी माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
मोदीजी, एवढय़ा दिवस तुम्ही कुठे होता? युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यीनींचा मोदींना सवाल
रतन टाटांनी पैसे लावलेल्या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार; तुफान कमाईची ही संधी सोडू नका
गोड बातमी! शिवतीर्थावर लवकरच हलणार पाळणा, राज ठाकरे होणार आजोबा
पुन्हा ‘कोरोना’चा हाहाकार; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा, पुन्हा लागणार लॉकडाऊन