“मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहीत असल्यामुळेच मी आधीच भाजपात आलो आहे”, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आज आठवले यांच्या हस्ते शिर्डी येथे राहता मतदारसंघात वयश्री योजनेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी शिवसेनेसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. “लोकसभेत शिवसेनेची अवस्था काँग्रेसप्रमाणे दयनीय होण्याची शक्यता आहे. त्यांच्या तीन-चार जागाही निवडून येतील की नाही सांगता येत नाही.”, असे म्हणत आठवले यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला.
पुढे बोलताना आठवले म्हणाले, “महाराष्ट्रात काँग्रेस लाचार पक्ष झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिसेनेच्या बिन बोलवलेल्या लग्नाला काँग्रेस वराती म्हणून सहभागी झाला आहे. काँग्रेसने आता 40 चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवीन सुरवात करावी,’ असा सल्ला आठवले यांनी दिला.
तसेच “अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेने अडीच वर्षाच्या फार्म्युल्याचा अवलंब करून भाजप सोबत यावं. लोकसभेत शिवसेनेची अवस्था काँग्रेसप्रमाणे दयनीय होण्याची शक्यता आहे. त्यांच्या तीन-चार जागाही निवडून येतील की नाही, हे सांगता येत नाही,” असे आठवले म्हणाले.
दरम्यान, आज आठवले यांच्या हस्ते शिर्डी येथे राहता मतदारसंघात वयश्री योजनेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच येथे भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि खासदार सुजय विखे-पाटील उपस्थितीत होते. यावेळी आठवले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
तसेच यावेळी येथे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सेनेवर टीका केली. ‘बोलघेवड्या माणसांमुळे पक्षाची अधोगती होईल. त्यामुळे भविष्यात सेनेला कोणी गांभीर्याने घेईल असं वाटत नाही, अशी सणसणीत टीका विखे-पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा भाजप विरुद्ध सेना असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धडकी भरवणारी बातमी! ‘या’ ठिकाणी दोन वर्षांनी एकाच ठिकाणी सापडले सर्वाधिक रुग्ण, घराबाहेर पडण्यास बंदी
देवेंद्र फडणवीसांच्या घरी मुंबई पोलीस जाणार, चौकशीही करणार; राज्याच्या राजकारणात खळबळ
बच्चू कडूंवर कोसळला दुखाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे झाले निधन; भावूक होत म्हणाले…
‘१२ वी’च्या पेपरच्या दिवशीच झाला वडिलांचा मृत्यु, पेपर लिहीताना घळाघळा वाहत होते अश्रू