तोंडाला लकवा झाल्यासारखं वाकडं तोंड करून हिंदू परंपरांचा अपमान करायचा उद्योग थांबव, नाहीतर..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली मधील इस्लामपूर येथील केलेले भाषण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी केलेल्या जातीयवादी विधानामुळे हिंदू समाज दुखवल्याचा आरोप सध्या अमोल मिटकरी यांच्यावर होत आहे. अमोल मिटकरी यांनी म्हंटले होते की, एका ठिकाणी मी गेलो तेव्हा तिथे कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना.

पुढे ते म्हणाले की, नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली, लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा.

आरारारा… कधी सुधरणार, असे विधान त्यांनी केलं होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर हिंदू समाजाने मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अमोल मिटकरी यांच्या या विधानामुळे पुन्हा राजकारण पेटले असून धार्मिक वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यातच आता भाजप चे आमदार राम सातपुते यांनी ट्विटरवर अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला असून सत्तेचा माज जनता उतरवेल असा इशारा दिला आहे. राम सातपुते यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, अमोल मिटकरी तोंडाला लकवा झाल्यासारखं वाकड तिकडं तोंड करून कायम हिंदू परंपरांचा अपमान करायचा तुझा उद्योग तात्काळ थांबव.

हिंदूंच्या धार्मिक मंत्रोउच्चाराची टिंगल करून स्वतःची विकृती दाखवू नकोस. तुझा सत्तेचा माज भविष्यात जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही,थोडं थांब, असा इशारा राम सातपुते यांनी दिला आहे. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असता अमोल मिटकरी यांनी केलेले विधान म्हणजे विरोधकांना सरकारवर ताशेरे ओढण्याची आयती संधी दिली आहे.

निवडणुकीच्या काळात अश्या प्रकारचे वक्तव्य करून कोणत्याही समाजाचा रोष पत्करून घेणे कोणत्याच पक्षाला परवडण्यासारखे नाही. या कारणामुळे येत्या काही दिवसात अमोल मिटकरी सदर प्रकरणात माफी मागतात की त्यांची भूमिका मांडतात? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या
आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं कुठं घुसू एवढं लक्षात ठेवा, रुपाली पाटलांचा ब्राम्हण महासंघाला इशारा
…तर संजय राऊतांना सुबुद्धी येईल; देवेंद्र फडणवीसांचा टोला
शुभमन गिलनंतर ‘या’ क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय सारा तेंडुलकरचं नाव, ‘तो’ फोटो झाला व्हायरल
शुभमन गिलनंतर ‘या’ क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय सारा तेंडुलकरचं नाव, ‘तो’ फोटो झाला व्हायरल