अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांना अलिशान आयुष्य जगायला आवडतं. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या संपत्तींमुळे चर्चेत येत असतात. पण बॉलिवूडचे सेलिब्रिटीच नाही, तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये असे काही अभिनेते आहे, जे त्यांच्या लक्झरी आयुष्यामुळे चर्चेत येतात. त्यातलाच एक म्हणजे राम चरण. (ram charan net worth)
साऊथचा सुपरस्टार राम चरण हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याचा RRR हा सिनेमा आला. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तयार केले आहे. तसेच १००० कोटींचा टप्पाही पार केला आहे. अभिनयासोबत राम चरण त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळेही ओळखला जातो. त्यामुळे आज आपण त्याच्याच बद्दल जाणून घेणार आहोत.
राम चरणचा फक्त दक्षिण भारतातच नाही, तर संपूर्ण जगात एक चाहता वर्ग आहे. राम चरण हा प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा मुलगा आहे. राम चरणने त्याच्या वडिलांप्रमाणेच आपले नाव कमावले आहे. तो चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
राम चरण फक्त चित्रपटातून कमाई करत नाही. राम चरणची स्वतःची विमान कंपनी देखील आहे. टर्बो मेघा एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड ही हैदराबादमधील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे. ही कंपनी ग्राउंड हँडलिंग सेवांमध्ये प्रमुख विमान कंपन्यांना मदत करते. राम चरण हा पोलो क्लबचा मालकही आहे, अभिनेत्याला लहानपणापासूनच घोड्यांबद्दल प्रेम आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणची मासिक कमाई कोट्यवधी रुपयांमध्ये असून त्याची वार्षिक कमाई ही १३०० कोटींच्या घरात आहे. राम चरणच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान कार आहेत. राम चरणकडे Aston Martin, Rolls Royce Phantom, Range Rover, Mercedes GL ३५० सारखी अनेक लक्झरी कार्स आहेत.
साउथ सुपरस्टार राम चरणचे हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये २५ हजार स्क्वेअर फुटांचे आलिशान घर आहे. ज्याची किंमत ३८ कोटी रुपये इतकी आहे. राम चरणचे हैदराबादचे घर एखाद्या राजवाड्यासारखे आहे, त्यात स्विमिंग पूल, जिम आणि टेनिस कोर्ट आहे. तसेच राम चरणचे मुंबईत आलिशान पेंट हाउस आहे. राम चरण मुंबईतले हे घर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या शेजारीच आहे. राम चरणने अनेक प्रकारच्या ब्रँड्समध्ये गुंतवणूक केली आहे ज्यातून त्याला रॉयल्टी मिळते.
महत्वाच्या बातम्या-
भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, गावकऱ्यांच्या खात्यावर आहेत करोडो रूपये जमा; वाचा पुर्ण माहिती
करण जोहरच्या बर्थडे पार्टीत ‘या’ बड्या स्टार्सनी लावली हजेरी, पहा खास क्षणांचे खास फोटो
सोनालीचा संस्कारी बहु’वाला अंदाज! सासरी बनवली खीर, उखाणाही घेतला, मंगळसुत्राच्या उलट्या वाट्या…






