Share

राकेश झुनझुनवालांसारखा पोर्टफोलिओ बनवायचाय? वाचा त्यांनीच सांगितलेला ‘हा’ सोपा फॉर्म्युला

काही दिग्गज गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून हजारो कोटींची कमाई करून आपले नशीब कसे बदलले याच्या कहाण्या आपण अनेकदा ऐकल्या असतील. या कहाण्यांच्या मोहकतेमुळे बरेच लोक शेअर बाजारातील या दिग्गजांकडे पाहतात. त्यामधीलच एक नाव आहे ते म्हणजे राकेश झुनझुनवाला. त्यांना आश्चर्य वाटते की शेअर मार्केटमधून यांनी इतका पैसा कमावला कसा? काय आहे यांच्या यशामागचे कारण?

या लेखात आपण राकेश झुनझुनवाला आणि त्याच्या पोर्टफोलिओबद्दल बोलणार आहोत, जे दलाल स्ट्रीटचे खूप प्रसिद्ध नाव आहे. अनेक लोक त्यांना शेअर मार्केटचा ‘बिग बुल’ देखील म्हणतात. या लेखात, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ रिटर्न्सद्वारे आपण गुंतवणूकीची तत्त्वे जाणून घेण्याचा प्रयत्न करू ज्याद्वारे प्रत्येक माणूस राकेश झुनझुनवाला यांच्यासारखा पोर्टफोलिओ तयार करू शकतो.

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सबद्दल सोशल मिडीयावर अनेक बातम्या किंवा फोटो येत असतात. आम्हीही तुम्हाला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असणाऱ्या शेअरची यादी सांगणार आहोत. तुम्ही जर झुनझुनवालांच्या शेअर्सवर एकदा नजर टाकली तर गुंतवणुकीशी संबंधित 4-5 महत्त्वाची तत्त्वे तुमच्या लक्षात येतील.

एक उत्कृष्ट पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी, स्टॉक मार्केट तज्ञही या गोष्टींचा अवलंब करण्याचा सल्ला देतात. पोर्टफोलिओमधील मर्यादित स्टॉक्स आहेत. वरील जवळपास 16 निवडक शेअर्सची यादी आहे आणि झुनझुनवाला यांची बहुतांश गुंतवणूक (सुमारे 60 टक्के) या शेअर्समध्ये करण्यात आली आहे.

झुंझुवालाच्या पोर्टफोलिओमध्ये IT, FMCG, बँकिंग आणि फायनान्शिअल, कमोडिटीज, फार्मा आणि ऑटो या क्षेत्रातील स्टॉकचा समावेश आहे. अशा प्रकारे, पोर्टफोलीओ वैविध्यपुर्ण आहे. विविधीकरण म्हणजे विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक त्यांनी केली आहे. रणनीतीला महत्त्व देणे खुप गरजेचे आहे.

झुनझुनवालांनी सर्व शेअर्समध्ये समान गुंतवणूक केलेली नाही, परंतु ज्या शेअरवर त्यांचा अधिक विश्वास आहे त्यावर त्यांनी मोठा सट्टा लावला आहे. किमान तोटा, कमाल नफा हे त्यांचे एक सुत्र आहे. या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक्स आहेत ज्यात त्यांनी केलेली गुंतवणूक तोट्यात गेली आहे. तरीही त्याची भरपाई इतर जास्त किंमतीच्या स्टॉक्सद्वारे केली जाते.

महत्वाच्या बातम्या
दोन्ही हाताने गोलंदाजी करणाऱ्या पोरानं क्रिकेट पंडितांनाही पाडलं विचारात; विचारला ‘हा’ महाकठिण प्रश्न
तब्बल ६०० रुपये किलोने विकला जातो ‘हा’ टोमॅटो, वाचा कशी करायची त्याची शेती
विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडताच राहुल गांधी कडाडले, म्हणाले…
स्टार झालेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत पण.., सोनाली कुलकर्णीबद्दल विजू माने असं का म्हणाले?

आर्थिक

Join WhatsApp

Join Now