भारतीय गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत गुरुवारी शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान सुमारे ८६१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ज्यामध्ये त्यांच्या दोन पोर्टफोलिओ स्टॉक्स – टायटन कंपनी आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सचा मोठा वाटा आहे. (rakesh jhunjhunwala 861 cr profit)
टायटनच्या शेअरची किंमत गुरुवारी २५८७ रुपयांवरून २७०६ रुपयांपर्यंत वाढली, म्हणजेच शेअरमध्ये प्रति शेअर ११८ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे स्टार हेल्थच्या शेअरची किंमत गुरुवारच्या सत्रात ६०८ रुपयांवरून ६४१ रुपयांवर गेला असून प्रति शेअरमध्ये ३२ रुपयांची वाढ झाली आहे.
राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीत गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ३,५७,१०,३९५ शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या ४.०२ टक्के आहे.
त्याचप्रमाणे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत टायटनचे ९५,४०,५७५ शेअर्स आहे. तर, झुनझुनवाला दाम्पत्याकडे टाटा समूहाच्या या प्रमुख कंपनीत ४,५२,५०,९७० कंपनीचे शेअर्स आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले की त्यांच्याकडे १० कोटींपेक्षा जास्त शेअर्स आहेत.
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ४,५२,५०,९७० शेअर्स आहे, असे असताना टायटनच्या शेअरची किंमत गुरुवारी ११८.७० रुपयांनी वाढली. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांच्या निव्वळ संपत्तीत अंदाजे ५३७ कोटींची वाढ झाली आहे.
तसेच राकेश झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थचे १०,०७,५३,९३५ शेअर्स आहेत, जे गुरुवारी प्रति शेअर ३२.२० रुपयांनी वाढले. स्टार हेल्थच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे राकेश झुनझुनवालाच्या एकूण संपत्तीत अंदाजे ३४२ कोटींनी वाढ झाली आहे. अशाप्रकारे त्यांच्या संपत्तीत एकूण ८६१ कोटींनी वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘द कश्मीर फाइल्स’ ने‘राधे श्याम’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ ला टाकले मागे; कमावले ‘तब्बल’ इतके कोटी
अनन्यावर चढला बोेल्डनेसचा फिवर, भरपार्टीत घालून आली स्विमसूटसारखा ड्रेस; पँट नसल्यामुळे लोकांनी केलं ट्रोल
महाविकास आघाडीचे 25 आमदार संपर्कात असून, प्रवेशाची वेळही ठरली; भाजपचा गौप्यस्फोट