लवकरच राज्यसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सध्या राज्याचे वातावरण तापलेले आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. (rajyasabha election shivsena and congress)
तसेच भाजप आता माघार घेण्याच्या तयारीत नाही, असे स्पष्टपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यावरुनच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आमदारांची मते न फुटण्यासाठी व्हीप जरी जारी केली तरी भाजपला मते देणाऱ्या आमदारांवर कोणी कोणतीही कारवाई करु शकत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारीच म्हटले होते. महाविकास आघाडीची मते फुटली तर शिवसेनेच्या किंवा काँग्रेसच्या लादलेल्या उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सहाव्या जागेसाठी मतांची बेगमी झाली आहे, त्यामुळे उमेदवार आता मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जेव्हा फडणवीसांची भेट घेतली तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आणखी गोंधळ उडाला आहे.
शिवसेनेला आधीच विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल भिती वाटत होती, तीच भिती आता शिवसेनेला पुन्हा वाटू लागली आहे. आमदारांची मते फुटली तर उमेदवारांचा पराभव होऊ शकतो. तसेच त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांचा पराभव झाला, तर राज्यातील सत्ता जाणे देखील नक्की होईल, अशी महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे.
इम्रान प्रतापगढी हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहे. काहीही झाले तरी प्रतापगढींना निवडून आणा, अशा सुचना काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या आहे. अशात काँग्रेसचा आपल्या आमदारांवर विश्वास नाहीये, त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा उमेदवार मागे घेण्यासाठी दवाब टाकण्यास सुरुवात केली आहे. या सर्व गोष्टीमुळे काँग्रेस आमदार नाराज असून ते नाराज आमदार फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभेची एक जागा की राज्यातील सत्ता असा इशाराच एक प्रकारे काँग्रेसने शिवसेनेला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या ३ महिन्यांचा संसार, लग्नाचा अल्बमही नव्हता आला; हिंदू बँक मॅनेजरच्या पत्नीने फोडला हंबरडा
मोठा खुलासा, केकेच्या ह्रदयाभोवती तयार झाला होता फॅटी लेअर, शरीरात सापडली १० प्रकराची औषधं
नालंदातील ‘या’ गावात हिंदू लोक पढतात दिवसातून 5 वेळा अजान, कारण वाचून आश्चर्य वाटेल