Share

शेतकऱ्यांना किडे-मुंग्या समजू नका, त्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्या, नाहीतर..; राजू शेट्टी संतापले

दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसुली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहे. तसेच या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकर संघटनेने मंगळवार सकाळपासून तारापार्कमधील महावितरणाच्या मुख्य कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. (shetty angry on electricity department)

राजू शेट्टी स्वत: या आंदोलनासाठी खुर्ची टाकून ठाण मांडून बसलेले आहे. शेतातील कामे सोडून काय भजन, किर्तन, मनोरंजन करायला येथे आलेलो नाही. दिवसभर उन्हात बसलो तरी देखील अधिकाऱ्यांना दखल घ्यावी वाटली नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

तसेच शेतकऱ्यांचा रोष समजून घ्या. त्यांना किडे-मुंग्या समजू नका. त्यांचे प्रश्न गांभिर्याने घ्या, नाहीतर शेतकऱ्यांचा हिसका काय असतो. ते येथेच दाखवून देऊ, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. आता या प्रश्नाची तिथले अधिकारी कधी दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, माजी सभापती सावरकर मादनाईक, राजेश पाटील, राजेंद्र गड्ड्यानवार, सागर शंभू शेट्टे, वैभव कांबळे, सागर कोंडेकर यांनी दिवसभर आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या व्यथांची मांडणी केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, दिवसा वीज मागणे हा आमचा अधिकार आहे. हे सांगताना शेट्टी यांनी महावितरणाच्या कारभाराचे वाभाडे काढले. जलविद्युत प्रकल्प चांगले असतानाही ते बंद असल्याचे भासवून वीजेची टंचाई आहे, म्हणून खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा घाट घातला होता.

तसेच पुढे ते म्हणाले, यावर आवाज उठवल्यानंतर चार तासात ते प्रकल्प सुरु झाल्याचे महावितरणाला जाहीर करावे लागले. ही आमच्या आंदोलनाची ताकद आहे. आताही दिवसा वीज देणे शक्य असतानाही महावितरण मुद्दाम रात्री वीज पुरवठा करत आहे.

रात्री अपरात्री पाणी पाजायला गेलेला पोर घरात येत नाही, तोपर्यंत आईबापाचा डोळा लागत नाही. वन्य प्राण्यांची भिती असतानाही जीव मुठीत घेऊन रात्री पाणी पाजायची वेळ येते. आमच्या पोरांच्या जीवाची काही किंमत या अधिकाऱ्यांना आहे की नाही? असाही सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
नोकरी सोडूून सुरू हा सुपरहिट बिझनेस, आरामात होईल महिन्याला ५ ते १० लाख रुपयांची कमाई
टिम इंडियातून काढल्यानंतर रिद्धिमान साहाला धमकी कोणी दिली होती? झाला मोठा खुलासा
लग्नाच्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडेने घातला डीप नेकचा ब्लाऊज, हॉट फोटो पाहून नेटकरी घायाळ

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now