राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील कांचनपूर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे काही लोकांनी एका दलित महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत तिच्यावर अत्याचार केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नवरा आणि मुलांसमोर तिला नग्न करुन तिच्यावर बलात्कार केला आहे. (rajsthan dhaulpur women rape)
त्या गुंडांनी त्यांना मारहाण करून तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडितेने त्या गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि मारहाणीसह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्यापपर्यंत एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. पीडितेने दाखल केलेल्या अहवालात तिने सांगितले आहे की, १५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता मोहरीचे पीक घेऊन ती पती आणि मुलांसह घरी परतत होती. पण वाटेत गावातील काही गुंडांनी त्यांचा रस्ता अडवला. गुंडांनी आधी तिच्या पतीला बेदम मारहाण केली.
त्यानंतर दोन आरोपींनी पीडितेला विवस्त्र केल्यानंतर तिचा पती आणि मुलांसमोर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण करून आरोपी फरार झाले. या घटनेनंतर पीडितेच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. पीडितेने सांगितले की, स्थानिक कांचनपूर पोलिस ठाण्यात नामित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलिस उपअधीक्षक विजय कुमार सिंग यांनी सांगितले की, पीडितेने दिलेल्या अहवालावरून आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा जबाब घेतल्यानंतर मेडिकल करण्यात येईल. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तसेच आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सुमारे तीन वर्षांपूर्वीही अलवर जिल्ह्यातील थानागाजी भागात अशीच एक भयानक घटना समोर आली होती. त्यावेळी दुचाकीवरून जात असलेल्या एका जोडप्याला वाटेत काही तरुणांनी अडवले. नंतर पतीला मारहाण करून ओलीस ठेवले.
तेव्हा पतीसमोरच पत्नीला विवस्त्र करून नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. चोरट्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. थानागाजी बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले होते. त्यानंतर त्यावर बरेच राजकारण झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
‘त्यावेळी फारूक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं’; ‘द काश्मीर फाईल्स’ वर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
‘द कश्मीर फाइल्स’मुळे पुन्हा वाद उफाळण्याची भीती; काश्मिरी पंडितांनी मांडलं रोखठोक मत