rajratne announce prize who thrown ink on chandrakant patil | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.
शाईफेकीवरुनही आता बराच वाद होताना दिसून येत आहे. काही लोक शाईफेकीला पाठिंबा देत आहे तर काही लोक विरोध करत आहे. आता बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकरांनी चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीला समर्थन केले आहे.
राजरत्न आंबेडकरांनी शाईफेक करणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शाईफेक करणारा कार्यकर्ता हा समता दलाचा होता. आता आंबेडकरांनीच समर्थन करत १ लाखाचे बक्षीस जाहीर केल्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यासारखे आहे. जर सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. मला वाटते काल, परवा थुंकी शाईच्या रुपात चंद्रकांत पाटलांवर पडली आहे. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने केलेल्या त्या कृत्याचं मी समर्थन करतो, असे राजरत्न आंबेडकरांनी म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, त्या समता दलाच्या कार्यकर्त्याला माझ्याकडून १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो. हे काम आम्हाला करायचे होते. पण ती संधी आम्हाला मिळाली नाही. त्याने या संधीचे सोने करुन दाखवले. त्यामुळे आंबेडकर कुटुंब त्यांचे आभारी आहे.
अशात दुसरीकडे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने ५१ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्याचे कपडे फाडणाऱ्याला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून ५१ हजार रुपये देण्यात येईल, असे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
pune : दुकान बंद करणार नाही, जे करायचं ते करा; बंदला विरोध करत पुणेकर महीलेना कार्यकर्त्यांनाच झापले..
प्रसिद्ध टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा अचानक मृत्यू; मृत्यूमागील धक्कादायक कारण आले समोर
Pune : महाराजांचा एक तरी गुण घ्या.., दुकान बंद करायला आलेल्या कार्यकर्त्यांना पुणेकर काकूंनी सुनावले; व्हिडीओ व्हायरल