Share

सुष्मिता सेनच्या भावाचा पत्नीवर गंभीर आरोप; म्हणाला, तिने माझ्याशी लग्न करण्याआधी…

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्यात लग्नानंतर एकाच वर्षात वाद सुरू झाला होता. आता त्यांनी एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत दोघेही वेगळे झाले आणि आता त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. (rajiv sen allegation on wife)

चारू असोपा तिच्या तुटलेल्या नात्यावर म्हणाली की, मी राजीव सेनला खूप संधी दिल्या. पण आता मला घटस्फोट घ्यायचा आहे. तर दुसरीकडे राजीव सेनने तिच्यावर पहिले लग्न लपवल्याचा आरोप केला आहे. आता दोघांनी कायमचं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

चारू आणि राजीव यांचे ७ जून २०१९ रोजी लग्न झाले होते आणि त्यांना १ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलगी झाली होती. राजीवसोबतचे नाते संपल्यानंतर चारूने म्हटले आहे की, आता त्यांच्या संसारात काहीच उरले नाही. ती म्हणाली, ‘सगळ्यांना माहीत आहे की, गेल्या ३ वर्षांपासून आमच्या नात्यात अडचणी सुरू होत्या, त्याला मी खुपदा संधी दिली पण तो सुधरत नाहीये.

चारूने दिल्ली टाइम्सशी संवाद साधताना सांगितले की, त्याच्यासोबत ट्रस्टच्या समस्या आहेत, मी ते आता सहन करू शकत नाही. मी त्याला एक साधी नोटीस पाठवली आहे ज्यात त्याला परस्पर संमतीने वेगळे होण्यास सांगितले आहे. आता आमच्या नात्यात काहीही नसल्यामुळे आम्ही वेगळे व्हावे असे मला वाटते.

राजीवनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, चारुने आधीही एक लग्न केले होते, त्याबाबत मला काहीच माहित नव्हते. मला त्याबद्दल कोणी काही सांगितले सुद्धा नाही. या बातमीने मला मोठा धक्का बसला होता. लग्नाला ३ वर्षे झाली तिने मला आधीच सगळं सांगायला हवं होतं. मला माहितीये तिचा भुतकाळ असेल, पण तिने ते सांगायला हवं होतं.

तसेच चारू तिच्या सुट्ट्यांना खूप महत्त्व देते. तिला कोणाचेही काहीही पडलेले नाही. तिला कुटुंबाची सुद्धा काळजी नाहीये. आजच्या काळात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे असे मला वाटते. जग बदलत आहे आणि त्याला फक्त पैशाची भाषा कळते, असेही राजीवने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
हत्तीसोबत फोटो काढणे मॉडेलला पडले महागात, हत्तीने स्कर्ट फाडून केलं असं काही.., पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच आनंद दिघेंच्या पुतण्याने केली ‘ही’ मोठी मागणी
मातोश्रीला कधी भेट देणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगीतली वेळ…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now