इंडियन प्रीमियर लीग तसेच रणजी ट्रॉफीचा भाग असलेल्या राजगोपाल सतीशने मॅच फिक्सिंगसाठी 40 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा खुलासा केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. सतीश आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सकडून खेळला आहे. सतीशने तामिळनाडू प्रीमियर लीग मध्येही भाग घेतला आहे.
पोलिसांना माहिती देण्यासोबतच सतीशने बीसीसीआय आणि आयसीसीलाही या प्रकरणाची माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा युनिटचे प्रमुख शब्बीर खंडवाला यांनी सांगितले की, सतीशने या प्रकरणासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि हे प्रकरण आयसीसीकडे गेले आहे.
या प्रकरणाची सर्व माहिती घेण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करतील, असे खांडवाला यांनी सांगितले. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूने आमच्याशी आणि आयसीसीशी संपर्क साधला आणि आम्हाला कळवले की कोणीतरी त्याच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आहे.
आम्ही या प्रकरणाचा सर्व तपशील घेतला आहे आणि आमच्या ACU अधिकाऱ्याला याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतील असेही त्यांनी सांगितले. बानी आनंद नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर सतीशशी संपर्क साधून 40 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
दोन खेळाडूंनीही या ऑफरला होकार दिल्याचे सतीशला सांगितले होते. सतीशने त्याची ऑफर नाकारली. सतीश यांनी फिर्यादीत लिहिले आहे की, 3 जानेवारी रोजी बनी आनंद नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर सतीशशी संपर्क साधला आणि त्याला 40 लाख रुपयांचे आमिष दाखवले आणि सांगितले की दोन खेळाडूंनी आधीच ऑफर स्वीकारली आहे.
सतीशने ती ऑफर नाकारली आणि याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत. बीसीसीआयही ते दोन खेळाडू कोण आहेत ज्यांनी ऑफर स्विकारली आहे त्यांचा शोध घेत आहे. या माहितीने खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
जुही चावलावर फिदा होता आमिर खानचा ‘हा’ नातेवाईक; सेटवरच केला होता प्रपोज
मोठी बातमी! ठाकरे सरकारची मोठी कारवाई, भाजपच्या दोन बड्या नेत्यांना अटक
VIDEO: गणेश आचार्यचा Oo Aantava गाण्यावरचा डान्स पाहून अल्लू अर्जुन-समंथाला फुटले हसू
धक्कादायक! ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अभिनेत्याचे अपघातात निधन, कुटुंबावर पसरली शोककळा





