Share

महाराष्ट्रातही पुन्हा निर्बंध लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान, वाचा काय म्हणाले..

rajesha tope
काही महिन्यांपासून राज्यात आणि देशभरात सातत्याने करोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. मात्र पुन्हा कोरोना विषाणू डोक वर काढताना पाहायला मिळत आहे.

यामुळे पुन्हा राज्यात कडक नियम लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्यातच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना खबरदारी घेण्याचे पत्र पाठवले आहे. यावरच राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी मोठं विधान केलं आहे.

लसीकरणाच्या बाबतीत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘मुलांमधलं लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. बुस्टर डोसबद्दल केंद्राने अद्याप निर्देश दिलेले नाहीत. मात्र कोणाला बूस्टर डोस घ्यायचा असेल तर खासगी रुग्णालयातून घेऊ शकता, अशी माहिती टोपे यांनी दिली.

पुढे बोलताना टोपे यांनी राज्यातील कोरोना निर्बंधांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रामधील कोरानाची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन टोपे यांनी केले. दिलासादायक बाब म्हणजे सध्यातही राज्यात मास्कसक्ती केली जाणार नसल्याच टोपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, “काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने ६० हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे,” असे टोपे म्हणाले. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

केंद्राने दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यचबरोबर आवश्यकता भासल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now