एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे घटनात्मक नसल्याचेही विरोधकांकडून म्हटले जात आहे.
याप्रकरणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. हे प्रकरण घटनापीठासमोर आहे, असे असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारबाबत राजभवनाकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा खुलासा केला आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता विरोधक हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. त्यांना शिवसेनेच्या अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने पाठिंबा दिला आणि शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
हे सरकार बनल्यानंतर ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हे सरकार घटनात्मक नसल्याचे म्हटले होते. हे सर्व प्रकरण सुरु असतानाच आता राजभवनाकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी माहिती राजभवनाने दिली आहे.
आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर आक्रमक झाली आहे. राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीसांना शपथ कशी घेऊ दिली? ही शपथच असंवैधानिक आहे, असे राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नागपूर पोलिसांकडून बागेश्वर बाबांना क्लीनचीट; म्हणाले, अंधश्रद्धेसारखं काहीच नाही…
…तर आम्ही ‘बांबू’ लावू; ‘पठान’बाबत मनसे आक्रमक; चित्रपटगृहचालकांना दिला ‘हा’ इशारा
‘मैं अब्बा का सपना पूरा कर रहा हूं’, नंबर १ बनताच सिराज भावूक, वडीलांच्या आठवणीत अश्रू अनावर