गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा पठान हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील एका गाण्यातील भगव्या बिकीनीमुळे अनेकजण त्यावर टीका करत होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली जात होती. आता अखेर हा चित्रपट बुधवारी रिलीज झाला आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तसेच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई सुद्धा केली आहे. पठान बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असल्यामुळे इतर काही चित्रपटांच्या स्क्रिनिंग बंद करण्यात आल्या आहे. यावरुन आता मनसे आक्रमक झाली आहे.
शाहरुख खानच्या कमबॅकसाठी बांबू आणि पिकोलो या चित्रपटांचा बळी का दिला जातोय? असा प्रश्न मनसे नेते अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. पठानचं भलं करा, पण मराठी चित्रपटांना त्यांचा वाटा द्या. त्यामुळे मल्टिप्लेक्सच्या चालकांनी सामंजस्याने वागायला हवं, असेही अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
औरंगाबादच्या ८ मल्टिप्लेक्समध्ये पठाणचे ४८ शो दाखवले जात असल्याने बांबू चित्रपटाला केवळ दोन मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळाली आहे. बांबूचा एका मल्टिप्लेक्समध्ये एकच शो दाखवला जात आहे, तर पिकोलो या मराठी चित्रपटाला एकाही मल्टिप्लेक्समध्ये स्थान मिळालेले नाही.
दरम्यान, महाराष्ट्रातील सांगली, मिरज, इचलकरंजी अशा विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने केली जात आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मालकांना शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यास सांगितले आहे.
तसेच इशाऱ्याची दखल घेतली नाही तर थिएटर मालकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली आहे. हे इशारे लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. यासोबतच चित्रपटगृहांबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र केसरीचा वाद शांत झाला असताना सिकंदर शेखचे मोठे वक्तव्य; म्हणाला, जनतेच्या मनामध्ये…
शाहरूख जोमात बॉयकॉट गँग कोमात! पहिल्याच दिवशी पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई, आकडा वाचून शाॅक व्हाल
आईच्या दुधाला अन् बापाच्या रक्ताला बेईमान झालेल्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही’