आज मनसेचा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी अनेक दिवसांनंतर राज ठाकरेंनी भाषण केलं. अनेक लोकांचं राज ठाकरेंच्या या भाषणावर लक्ष होतं कारण तब्बल २ वर्षांनंतर राज ठाकरे भाषण करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली. सगळ्यात आधी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना झाप झाप झापलं.
शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरेंनी राज्यपालांना चांगलंच सुनावलं. ते म्हणाले की, तुम्हाला शिवराय आणि रामदास स्वामी समजतात का? ज्याबद्दल माहिती नाही त्याबद्दल का बोलता? पुढे ते म्हणाले की, राज्यपालांना नको तिथं बोटं घालायची सवय आहे. सावित्रीबाईंवर केलेल्या विधानावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर टीका केली.
राज ठाकरे म्हणाले की, फुलेंच्या लग्नावर बोलत आहात तुमचं लग्न झालंय का? तेव्हा लहाणपणी व्हायची लग्न तुमचं अजून नाही झालं. पुढे ते म्हणाले की, रामदासांनी कधीच स्वताला शिवरायांचे गुरू म्हणवून घेतलं नाही. फक्त महापुरूषांना बदनाम करून माथी भडकवण्याचं काम चालू आहे. निवडणूकीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, मला सध्याच्या वातावरणात निवडणूकच दिसेना.
ओबीसींचं कारण देत निवडणूका पुढे ढकलल्या असं त्यांनी सांगितलं. पण मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे निवडणूका पुढे ढकलल्या. निवडणुका लांबणीवर पडणार नोव्हेंबरपासून सांगत होतो. मुळात लोकांना निवडणुकांमध्ये काहीच रस नाहीये. निवडणुका दिवाळीनंतर होतील असा दावाही राज ठाकरेंनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, लॉकडाऊनसारखे दिवस पहावे लागतील असं कधीच वाटलं नाही.
कोरोना देशावरचं नाही तर जगावरचं संकट होतं. तसेच राज ठाकरे असेही म्हणाले की, महापुरूषांना बदनाम करून मत मिळवण्याचा काहींचा डाव सुरू आहे. काय चाललंय राज्यामध्ये मला कळत नाही. सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायचा निघाले, विरोधी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, मग उरलं कोण? आपण.
दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, संजय राऊत किती बोलतात? प्रश्न बोलण्याचा नाहीये आपण काय बोलतो कसं बोलतो, भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्यात बघत आहेत. ते काय शिकतील. राजकारणात टीकेची पातळी इतक्या खाली गेली नव्हती. राज ठाकरेंनी यावेळी संजय राऊतांची मिमीक्रीही करून दाखवली.
महत्वाच्या बातम्या
“म्हणजे उद्या खाजगीमध्ये आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?” राष्ट्रवादी फडणवीसांवर संतापली
“रात्री मोठ्याने गाणी लावत रस्त्यावर गाड्यांचे स्टंट करणं हे छत्रपतींचे विचार आहेत का?”
बिग ब्रेकींग! अखेर एसटी संपावर तोडगा निघाला; उद्या विधीमंडळात होणार मोठी घोषणा
काश्मिरी पंडीतांवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या काश्मिर फाईल्स सिनेमाच्या प्रमोशनास कपिल शर्माचा नकार