Share

ठाण्याची उत्तर सभा ठरणार वादळी, ‘या’ तीन नेत्यांवर गरजणार राज ठाकरे; टीझरही आला समोर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. (raj thackeray uttar sabha teaser)

राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहे. भाजपने राज ठाकरेंच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, तर महाविकास आघाडी सरकारने यावर टीका केली आहे. त्यानंतर १२ एप्रिलला ठाण्यात पुन्हा एकदा राज ठाकरेंची सभा होणार आहे, ही ‘उत्तर’ सभा वादळी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

राज ठाकरेंच्या या सभेचा टीझर आला असून हा टीझर सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली नव्हती. त्यांनी फक्त आणि फक्त महाविकास आघाडीलाच निशाण्यावर धरले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती.

मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदींवरील भोंगे खाली उतरवावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय घेतला नाही, तर मशिदींसमोर हनूमान चालिसाचे स्पीकर लावले जातील, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

हे अचानक भोंगे बंद करायची भाषा करायला लागले. इतके दिवस झोपा काढल्या होत्या का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला होता. तर गुढीपाडव्याला शीवतीर्थावर जो भोंगा वाजवला होता, तो भाजपचा होता, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावला होता.

तसेच जेष्ठ नेते शरद पवारांनीही राज ठाकरेंच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली होती. राज ठाकरे तीन चार महिन्यानंतर अचानक प्रकटतात. एखादं व्याख्यान देतात आणि परत भूमिगत जातात. या मधल्या काळात ते काय करतात ते माहित नाही, असे शरद पवरांनी म्हटले होते. याच टीकांना आता राज ठाकरे उत्तर सभेत उत्तर देणार असल्याचे म्हटले जात आहे.

त्यासंबंधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ उत्तर सभेचा टीझर आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार, संजय राऊत आणि शरद पवार यांनी केलेल्या टीका दाखवण्यात आल्या आहे. तसेच करारा जबाव मिलेगा असे या व्हिडिओत म्हटले आहे. त्यामुळे आता उत्तर सभेत नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
चक्क ब्राम्हण मुलीने ओळखपत्रातून आडनाव आणि धर्म काढून टाकण्याची केली मागणी; काय आहे नेमकं कारण वाचा
“त्यांचा हेतू स्वच्छ नव्हता, त्यांना शरद पवारांना…”, आव्हाडांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांची संपत्ती परत करा; रुपाली पाटील यांची पोस्ट तुफान व्हायरल, वाचा पोस्ट

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now