महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते वाढदिवसामुळे चर्चेत आले आहे. १४ जूनला त्यांचा वाढदिवस झाला. त्यामुळे त्यांच्यावर लाखो चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. (raj thackeray tattoo on chest)
राज ठाकरे यांचे अनेक चाहते आहे, जे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामे करताना दिसत आहे. पण अशात राज ठाकरे यांचा एक जबरा फॅन चर्चेत आला आहे. एका चाहत्याने राज ठाकरेंची छबी आपल्या छातीवर बनवून घेतली आहे. संबंधित तरुण हा सोलापूरचा राहणारा आहे.
विशाल भांगे असे या तरुणाचे नाव असून तो माढा तालुक्यात मोडनिंब येथे राहतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो राज ठाकरेंचा मोठा चाहता आहे. आपल्या छातीवर त्याने राज ठाकरे यांचे टॅटू काढल्यामूळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. राज ठाकरे कायम हृदयात राहावे यासाठी मी हा टॅटू काढलाय, असे तरुणाने म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या या चाहत्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. राज ठाकरे हे राजकारणी म्हणून महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात प्रसिद्ध आहे. तसेच ते एक व्यंगचित्रकार असल्यामुळेही त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनेकांनी व्यंगचित्र काढूनही राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहे. पण विशालने थेट छातीवर टॅटूच काढले आहे, त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
विशाल भांगेच्या या टॅटूवर राजकीय नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता मनसे नेते बाळा नांदगावकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विशाल भांगेची भेट घेतली आणि त्याचं कौतूक केलं आहे. सध्या संपूर्ण तालुक्यात त्याचीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या वाढदिवसाबाबत मोठी घोणषा केली होती. ते म्हणाले होते की, मी वाढदिवस साधेपणाने साजरा करणार असून कोणाचीही भेट घेणार नाहीये. तसेच वाढदिवसाच्या दिवशी घरी भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथुनच शुभेच्छा द्या, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडेंचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा भाजपचा प्रयत्न; महाजनांनी उघड केले आतले सत्य
बरं झालं सुशांतने तुला ‘या’ रुपात पाहिले नाही, सुशांतचे चाहते अंकितावर भडकले, पहा व्हीडिओ
‘या’ कारणामुळे पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं