Share

औरंगाबादला जाताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार राज ठाकरे

raj thackeray

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांची १ मे रोजी होणारी औरंगाबादेतील सभाही सद्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याला तशी कारणंही आहेत. आधी सभेला परवानगी मिळण्यावरून जोरदार वाद सुरू होता. आता परवानगी मिळाली आहे पण तरीही विरोधी पक्षांकडून या सभेला विरोध केला जात आहे.

या सभेला परवानगी जरी मिळाली असली तरी पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी दिल्या आहेत. या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेआधी राज ठाकरे पुण्यात पोहोचले आहेत. आज राज ठाकरे पुण्यातच मुक्काम ठोकणार आहेत.

उद्या सकाळी साडेआठच्या सुमारास औरंगबादच्या दिशेने ते रवाना होणार आहेत. पण औरंगाबादेला जाताना ते रस्त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी राज ठाकरेंच्या उद्याच्या कार्यक्रमासंबंधित माहिती दिली आहे.

पुण्यातून बाहेर पडताना राज ठाकरेंचा ताफा वढू-तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या समाधीला स्थळाला भेट देणार आहे. या ठिकाणी राज ठाकरे दर्शन घेणा असून पुढील प्रवासासाठी निघतील असं बाबर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी १०० ते १५० ब्राम्हण ‘राजमहाल’ या ठिकाणी येणार आहेत.

पुढील कार्य योग्यरितीने पार पडावे यासाठी १०० ते १५० ब्राम्हण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आशीर्वाद देणार आहेत, असंही पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले आहे. मुंबई येथून राज ठाकरे दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील त्यांच्या राजमहाल येथील निवासस्थानी आले.

त्यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार होती. राज ठाकरेंच्या सभेनंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे. आधीच या सभेला अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला आहे. पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर ताफा सभेत उपस्थित असणार आहे.

महत्वाच्या बातम्या
कलिंगडमध्ये आहेत व्हाएग्राचे गुण; पुरुषांसाठी असलेले फायदे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
सभा ही कोणाचे रेकॉर्ड मोडण्यासाठी नाही, तर…; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांना टोला
शाहरुखने मला फोन करुन KKR साठी खेळण्यास सांगितले होते, पण…; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा
“औरंगाबाद शिवसेनेचा बाले किल्ला, तर तिथे एमआयएमचा खासदार कसा निवडून आला?”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now