Share

माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळासह आयोध्यात देखील वातावरण चांगलच तापलं. अखेर राज ठाकरेंनी ट्विट करत ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित,’ अशी माहिती दिली.

त्यानंतर ही राज यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आला. ‘मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. हा सगळा सापळा हे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी आज केला आहे.

आज राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जाहीर सभा होत आहे. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागची कारण सांगितली आहे. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणतात, ‘अयोध्या दौरा तूर्तास रद्द केला. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले.’

पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘अयोध्येला येऊ देणार नाही वगैरे सुरू झालं. मी बघत होतो. मला मुंबईतून, दिल्लीतून, उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. हा सगळा ट्रॅप, सापळा असल्याचं लक्षात आलं आणि आपण यात अडकलं नाही पाहिजे, असा विचार केला,’ असं राज ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं.

‘सगळी रसद पुरवली गेली, ती महाराष्ट्रातून, ज्यांना अयोध्या वारी खुपली होती, त्यांनी हा आराखडा आखला,’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. पुढे राज ठाकरे म्हणतात, ‘ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली, तेव्हा पुण्यात अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच हे प्रकरण सुरू झालं.’

दरम्यान, ‘अयोध्येला येऊ देणार नाही वगैरे. मी सगळं पाहात होतो काय चाललंय ते. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. एक वेळ अशी आली की मला लक्षात आलं की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकायला नको. कारण या सगळ्या गोष्टींची रसद महाराष्ट्रातून सुरू झाली, असं राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
ऋताच्या लग्नात ऑनस्क्रिन जोडीदारच होता गैरहजर, स्वत: ऋतानेच याबाबत केला मोठा खुलासा
PHOTO: ऍड शुट करण्यासाठी अनुषा दांडेकर झाली टॉपलेस, फोटो पाहून तुमचेही उडतील होश
भुल-भुलैया 2 आणि धाकडने बॉलिवूडला आणले पुन्हा रुळावर, पहिल्या दिवशी केली ‘एवढी’ कमाई
मुस्लिम समजून वृद्ध व्यक्तीची बेदम मारहाण करून हत्या, हत्या करणारा निघाला भाजप नेता

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now