Share

bjp : भाजपने शब्द पाळताच राज ठाकरे झाले भावूक; म्हणाले प्रिय मित्र देवेंद्रजी तुम्ही…

Devendra Fadanvis Raj Thackeray

bjp : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यामुळे ठाकर गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडे मागणी केली होती.

त्यानंतर आज भाजपच्या जेष्ठ नेत्याने अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेत असल्याचं जाहीर केलं. यामुळे भाजपने राज ठाकरेंची मागणी मान्य केली असल्याचं बोललं जातं आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.

अखेर अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. याचा धागा पकडत आता राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केली आहे. ‘काल मी केलेल्या विनंतीला मांन देऊन भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला.. सर्वांचे आभार..,’ असं फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हंटलं आहे.

 

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02ENkZDPcQbNtmgCuUHMoZ7JLCGg7SYJWCgWGo7g6Jva2eddbUyzHHEQ5ieiMrt6nUl&id=100044307376010

 

 

तसेच भाजपाच्या या निर्णयानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय आधीच झाला असता, राजकीय चिखलफेक टाळता आली असती असे ते म्हणाले. सध्या भाजपने माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले. पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते पक्ष आदेशाचा पालन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र असं असलं तरी देखील राज ठाकरे यांनी भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती भाजपाची केली होती.

महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now