महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना एक आदेश देण्यात आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना यापुढे केवळ मराठी हृदयसम्राट ही पदवी लावावी, इतर कोणतीही पदवी लावू नये, असा आदेश देण्यात आला आहे. (raj thackeray on workers)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयाने हा आदेश जारी केला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. राज ठाकरेंचा प्रमुख अजेंडा हा मराठी हाच असल्याने त्यांना मराठी हृदयसम्राट म्हणून सोडून कोणतीही पदवी लावू नये, म्हणून हा आदेश जारी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या मराठी हृदयसम्राट या उपाधी व्यतिरिक्त कोणतीही उपाधी लावू नये. तसेच या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे ही नम्रविनंती, असे निवेदन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, घाटकोपर मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यावेळी हिंदू हृदयसम्राट अशी उपाधी त्यांना कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. आता या घटनेची मनसेने गंभीर दखल घेतली आहे.
राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार असे जाहीर केले होते. शिवसेना सोडून त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मराठीच्या मुद्यावर या पक्षाने तब्बल १३ जागा जिंकल्या होत्या.
राज ठाकरेंचा प्रमुख अजेंडा हा मराठी हाच आहे. मध्यंतरी मनसे भाजपसोबत युती करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण भाजपने मनसेला मराठीच्या मुद्याचा त्याग करण्याची अट घातली होती. त्यामुळे भाजप मनसेची होणारी युती तुटली असल्याचेही म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
नजर हटी दुर्घटना घटी! आई काढत होती फोटो, मागे स्विमींग पुलमध्ये बुडून २ वर्षांच्या लेकाचा मृत्यु
बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे सॅनिटायझेशन सुरु’, संजय राऊतांचा सोमय्यांना सूचक इशारा
बप्पी लहरींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख; ट्विट करत म्हणाले..