शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण आधीच ढवळून निघाले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार गेल्याने महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का बसला होता. अशात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (raj thackeray on uddhav thackeray)
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातच नाही, तर देशात खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपमध्ये मात्र आनंदाचे वातावरण दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर अनेक राजकीय नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
तसेच राज ठाकरे यांनी हिंदीमधूनही एक पोस्ट केली आहे. जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना निजी कर्तृत्व मानने लगता है, उस दिनसे उसके पतन का प्रवास शुरु होता है, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1542409873895620608
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंडखोरी केली, तेव्हा राज ठाकरे हे रुग्णालयात दाखल झालेले होते. त्यांच्या हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. त्यानंतर या राजकीय घडामोडीदरम्यान राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. पण त्यांनी त्यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे वारंवार आमदारांना परत येण्याची विनंती करत होते. आपण सर्वजण एकत्र बसून त्यावर चर्चा करु, मार्ग काढू असे म्हणत होते. पण आमदार येण्यासाठी तयार नव्हते. या सर्व गोष्टींमुळे अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून उद्धवजी तुम्ही खुपच नशीबवान आहात, लब्यू..; मराठी अभिनेत्याची ठाकरेंसाठी खास पोस्ट
तुमच्यामुळे राज्यात जातीय दंगली झाल्या नाहीत…, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीकडून ठाकरेंचे कौतूक
करेक्ट टायमिंग! महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट, चर्चांना उधाण