गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. यावेळी राज ठाकरेंनी मशिदीच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (raj thackeray on mosques loudspeaker)
मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदींवरील भोंगे खाली उतरवावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय घेतला नाही, तर मशिदींसमोर हनूमान चालिसाचे स्पीकर लावले जातील, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
मी धर्मांध नाही, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी मी मशिदींवरील भोंग्यांबाबत बोललो होतो. पण अजूनही ते सुरु आहे. यापुढे सरकारने मशिदीवरील हे भोंगे काढले नाही, तर मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पीकर लावू आणि त्यात हनूमान चालिसा वाजवू, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. सकाळी पाच वाजल्यापासून त्रास होतो. कोणत्या धर्मात लाऊडस्पीकर लिहिलं आहे? धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांमध्ये बघा तुम्हाला लाऊडस्पीकर दिसणार नाही. तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करा पण घरात करा, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिर आहेत, टाका धाडी. काहीच मिळणार नाही. म्हणून मला जातीत पडलेला, असा हतबल असलेला, सत्तेसमोर लाचार झालेला समाज मला आवडत नाही. अशांचं नेतृत्व मला करायचं नाही, मला आरेला कारे करणारी माणसं पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
दरम्यान, भाषणाच्यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. आपला देश जातीपातींमध्ये विभागला गेला आहे. महाराष्ट्रातही हीच गत आहे. महाराष्ट्र हा जातीपातींमध्ये विभागावा, ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. लोक जातीपातींमध्ये विभागले जावे, शरद पवारांची हिच इच्छा आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
चौकशी लागली की माणसं रिव्हर्स गिअर टाकतात; जयंत पाटलांच राज ठाकरेंना प्रत्युत्तर
”चीनला आम्ही बघून घेऊ, रशियाच्या तेलावर अवलंबून असलेल्या पाश्चात्य देशांनी आम्हाला भाषण देऊ नये”
रणबीर कपूरसोबत ‘या’ बॉलिवूड चित्रपटात झळकणार रश्मिका मंदाना, मेकर्सनी केली मोठी घोषणा