महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. भोंगे उतरवा नाहीतर, मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवू, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. (raj thackeray on mns workers)
राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. इतकंच नाही, तर याचे पडसाद देशभरात उमटले आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पक्षाला मिळणार पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. पण राज ठाकरेंच्या या भूमिकेवर काही पदाधिकारी नाराज आहे. त्यावर आता राज सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले आहे.
राज ठाकरे पुढच्या महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याची तयारीही मनसेकडून सुरु आहे. रेल्वे बुक करण्यासाठी मंत्री रावसाहेब दानवेंना पत्र पाठवण्यात आले आहे. अशात दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1522977259828969472
माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये.तसेच इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे, असे राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असेही राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यावर काही पदाधिकारी बोलताना दिसून आहे. तसेच कार्यकर्तेही आपल्या प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी हा आदेश दिला आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या मशिंदीवरच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण आपण पक्षातच राहणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले होते. तसेच पक्षप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे वसंत मोरे यांनी कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमानसमोरील महाआरती आयोजन केले होते. त्यावेळी तिथे राज ठाकरे दिसले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे वसंत मोरेंवर नाराज असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये’, शत्रुघ्न सिन्हांवर आरोप करणाऱ्या महिलेवर भडकला ‘हा’ व्यक्ती
प्रेग्नेन्सीदरम्यान प्रेग्नेंन्ट न दिसणंही गुन्हा का? ट्रोलर्सला अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर
कतरिनाने शेअर केला स्विमिंग पूलमधील पती विकीसोबतचा रोमँटिक फोटो; म्हणाली, मी आणि माझा…