गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घटना घडत आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात ४० शिवसेना आमदार असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे नाट्यमय घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जुन भाषण तुफान व्हायरल झाले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली होती. शिवसेनेने मनसेत सुरंग लागला होता. मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते.
ही गोष्ट राज ठाकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यावेळी राज यांनी केलेले काही व्यक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी राज यांचा हा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या राज यांच्या भाषणाचा तो जुना व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
वाचा काय आहे त्या व्हिडिओत..? ‘बाळासाहेब जसे वागायचे, त्यांनी जे शिकवलं ते मी आत्मसात केलं आहे, उद्धव ठाकरेंकडून अत्यंत नीच अशी खेळी खेळली गेली. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही आणि मी हे कधीच विसरणार नाही. आणि मी विसरलेलो नाही, हे त्यांना भविष्यात कळेल,’ असेही राज ठाकरे म्हणाले होते.
‘बाळासाहेबांना सांगून मी सेनेतून बाहेर पडलो होतो. मला हे उद्धव वगैरे आहेत ना त्यांच्या या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर पडलो. मी बाहेर पडल्यावर जे प्रेमाने माझ्यासोबत येतील ते राहतील. त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही, करणारही नाही;’ असं राज यांनी म्हंटलं होतं.
दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे बीडच्या शेतकरी पुत्राने राज्यपालांना लिहिलेल्या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सत्तास्थापनेच्या घडामोडींना देखील वेग आला आहे.
शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रत्येक वेळेस आव्हान देऊन चालत नाही; आमदार भास्कर जाधव संजय राऊतांवर भडकले
धोका देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची संपत्ती वाचून अवाक व्हाल; ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या…