गेल्या काही महिन्यांपासून आगामी महापालिका निवडणूकांसाठी सर्व पक्षातील नेते जोमाने कामाला लागले आहे. सर्व नेते आपल्या पक्षाचा प्रचार करत आहे. तसेच वेगवेगळे कार्यक्रम बैठका घेताना दिसून येत आहे. अशात मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही सक्रीय आहेत. (raj thackeray new look viral)
बुधवारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे . या बैठकीत निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे यांचा नवा लुक पाहायला मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत निवडणूकीत मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी रेश्मा टेळे या विजयी झाल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रेश्मा टेळे यांचा मुंबईतल्या एमआयजी क्लब इथं सत्कार करण्यात आला आहे.
तसेच यावेळी रेश्मा टेळे यांनी राज ठाकरे यांना घोंगडी आणि काठी भेट दिली आहे. तसेच त्यांच्या आग्रहास्तव राज ठाकरे यांनी खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेत त्यांच्याबरोबर फोटोही काढले आहे. राज ठाकरे यांच्या या लुकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून त्यांचे फोटोही चांगलेच व्हायरल होत आहे.
दरम्यान, या बैठकीत कोणत्या पक्षाबरोबर युती केली जाणार की नाही याबाबत चर्चा झालेली नाही. राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले आहे. तसेच युतीच्या चर्चेत पडू नये, अशा सुचनाही राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहे.
बैठकीत निवडणूकीची रणनिती, इच्छुक उमेदवारांची निवड यावरही चर्चा झाली आहे, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच कोरोना काळात मुंबईकरांना खुप त्रास झाला आहे. सत्ताधारी शिवसेना मदतीसाठी पुढे आली नाही, त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे प्रभाग रचना बदलली तरी लोकांची नाराजी बदलू नाही शकत, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतात निघून जा, म्हणत हल्लेखोरांनी घेतला हिंदू व्यापाऱ्याचा जीव; पाकिस्तानातील घटनेने उडाली खळबळ
हिंदुस्थानी भाऊ लायनीवर आला; चाहत्यांना म्हणाला आता कोणते आंदोलन करू नका..
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम अंजली भाभी पैशांसाठी करायची ‘हे’ काम, स्वत:च केला होता खुलासा