Share

संजय राऊतांना अटक होणार? राज ठाकरेंनी सुचक विधान करत सांगितली आतली खबर

sanjay raut

सध्या राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यातील विशेष बाब म्हणजे ईडीने आतापर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या एका पुण्यातील सभेत सेना खासदार संजय राऊत यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे दिव्यामध्ये मनसेच्या शाखेच्या उद्धाटनासाठी आले असता त्यांना पत्रकारांनी संजय राऊतांच्या विधानाविषयी विचारणा केली. यावेळी राज ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे राऊत यांच्या मागे सध्या ईडीच्या चौकशीचा सपाटा सुरु आहे. यामुळे ठाकरे यांना नेमकं काय म्हणायचंय? यावरून तर्कवितर्क लागले जात आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसे च्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजु पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच राज ठाकरे यांनी उद्दघाटन केलं आहे. यावेळी मनसे नेते उपस्थित होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी राऊत यांची नक्कल करत टीका केली होती. “संजय राऊत कुठचाही मागचा-पुढचा विचार न करता आपल्या तोंडाला येईल ते बडबडतात. अरे किती बोलता? चॅनल लागलं का हे सुरु. कॅमेरा बाजूला झाला की सगळं व्यवस्थित. मग हे अॅक्शन कुठून आलं?”, अशी टीका ठाकरेंनी केली होती.

त्यानंतर राऊतांनी देखील नंतर ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. “नक्कल मोठ्या माणसांचीच करतात. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. ईडीने बोलावलं म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहू. आम्हाला कुणाची भीती नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, असं राऊत यांनी उत्तर दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या
दाऊदचा भाचा महाविकास आघाडीत सक्रीय? राणेंनी शेअर केलेल्या फोटोमुळे उडाली खळबळ
राणेंचा पाय खोलात! शरद पवारांचं नाव दाऊदशी जोडल्याचं प्रकरण महागात पडणार; गुन्हा दाखल
वापरलेल्या चहापत्तीपासून बनवता येते उत्तम खत, जाणून घ्या खत बनवायची सोपी पद्धत
“तो माझा नाही, मोदीजींचा मुलगा आहे”; युक्रेनमधून विद्यार्थी परतल्यावर वडिलांची भावूक प्रतिक्रिया

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now