Share

भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, त्यामुळे…; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला ‘हा’ आदेश

raj thackeray

गेल्या काही दिवसांपासून मनसेने मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या मुद्यावरुन मुंबईच्या सभेत सर्वातआधी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्यांनी मनसैनिकांना मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचे आदेशही दिले होते. (raj thackeray letter to mns workers)

मशिदींवरील भोंगे काढले नाही, तर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले होते. असे असताना आता हा विषय कायमचा संपवायचा आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच त्यासाठी राज ठाकरेंनी एक नवा कानमंत्र आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत एक पत्र शेअर केले आहे. त्यामध्ये मनसैनिकांना त्यांनी एक आदेश दिला आहे. त्यांनी पत्र घराघरात पोहोचवून आंदोलनाला पाठिंबा मिळवा, असे म्हटले आहे.

राज ठाकरेंनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांना ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या लोकांपर्यंत ते पत्र पोहोचवण्यास सांगितले आहे. ते पत्र राहत असलेल्या ठिकाणी वेगवेगळ्या घरात नेऊन द्यावं, असा आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1532322001553002497

राज ठाकरेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही

महत्वाच्या बातम्या-
सासरच्या त्रासाला कंटाळून आली माहेरी, UPSC पास करत देशात पटकावला १७७ वा क्रमांक
IAS झाला म्हणून पुर्ण गावात वाटले पेढे, पण सत्य समोर आल्यानंतर आला हार्ट अटॅक, तुटले स्वप्न
शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now