केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतिर्थावरील भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या काही नेत्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर अशीच मागणी मनसेकडूनही करण्यात आली.
मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर मंदिरांवर लाऊड स्पीकर लावू असा इशाराही काही मनसे नेत्यांनी दिला होता. त्यावर आज रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधाला विरोध करणे चुकीचे आहे, असं म्हणत आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर शाब्दिक निशाणा साधला आहे.
गुढीपाडवाच्या मेळाव्यात मशिदींवरचे अजानचे भोंगे हटवले नाहीत, तर त्यांच्यापुढे मोठ्या आवाजात मंदिरांवर हनुमान चालिसा लावली जाईल, असे राज ठाकरे म्हणाले होते. याबाबत बोलताना आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नाही. विरोधाला विरोध योग्य नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना आठवले म्हणाले, “कोणाला मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायेत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नसल्याचे ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद असल्याचं आठवले म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना आठवले यांनी शिवसेनेला भाजप सोबत येण्यासाठी साद घातली. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसबरोबर जाऊ दिले नसते. पण, अजूनही वेळ गेलेली नसून अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे यांनी विचार करावा.’
महत्त्वाच्या बातम्या
IPL आणि सचिनची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी ट्रोलरची जिमी नीशमने केली बोलती बंद, म्हणाला, मी सध्या..
भ्रष्टाचाराप्रकरणी सोमय्या पितापुत्रांच्या अटकेचा मार्ग मोकळा; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय
इम्रान खान यांच्यानंतर शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड, भारतावर याचा काय परिणाम होणार?
मला आई व्हायचं आहे आहे माझ्या पतीला पॅरोल द्या, पत्नीच्या याचिकेवर न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय