महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेली दिसली. यावेळी सभेसाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या, त्या अटींचे उल्लंघन त्यांनी केले असल्यामुळे त्यांच्या विरोधात औरंगाबाद सिटी चौक पोलिस ठाण्यात आज एफआयआर दाखल करण्यात आला होता. (raj thackeray going to aurangabad)
भडकाऊ भाषणे करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज ठाकरेंवर आहे. १ मे रोजी झालेल्या औरंगाबाद सभेत राज ठाकरे यांनी ३ मे नंतरही मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर ४ मे पासून मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करतील, असा अल्टिमेटम दिला होता.
सभेला परवानगी देण्यापूर्वी ठेवण्यात आलेल्या १६ पैकी १२ अटींचा भंग केल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला होता. त्यांच्यावर आयपीसी कलम ११६ (गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), ११७ (प्रक्षोभक भाषण), १५३ (दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ (अटी आणि नियमांचा भंग) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या अटकेची तयारी सुरू झाल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अटकेची शक्यता वाढत असतानाच राज ठाकरे यांना अटक टाळण्यासाठी कोणते मार्ग असू शकतात, अशीही चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाच्या ऑडिओ-व्हिडिओची पाच तास छाननी करण्यात आली. यानंतर आज दुपारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे स्वत: औरंगाबादमध्ये जाऊन जबाब देणार आहे. तसेच अटक करण्यास सांगितल्यास ते स्वत:ला अटक करुन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील तणाव आणखी वाढू शकतो आणि मनसेचे कार्यकर्तेही आक्रमक होऊ शकतात असे म्हटले जात आहे.
दरम्यान, राज ठाकरेंकडे दोन मार्ग आहेत. आता त्यांना हवे असल्यास ते अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करू शकतात. जामीन अर्ज स्वीकारल्यास अटक होणार नाही. दुसरा पर्याय म्हणजे राज ठाकरे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला न्यायालयात आव्हान देऊ शकतात आणि ते रद्द करण्याची मागणीही करू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
१५×१५×१५ चे सूत्र तुम्हाला माहिती आहे का? जे बनवू शकते तुम्हाला करोडपती, वाचा संपूर्ण माहिती
बिअरचा कॅन 52 रुपयांना आणि रमची बाटली 350 रुपयांना; गुजरातमध्ये दारूचे दर इतके कमी का?
मंदीरावरील भोंग्यावर कारवाई करणार पवार पहीले हिंदू…; आता राणेंचीही भोंगा प्रकरणात उडी