Share

हा विझलेला पक्ष नाही, तर समोरच्याला विझवणारा पक्ष; राज ठाकरेंचा जयंत पाटलांवर पलटवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. (raj thackeray criticize jayant patil)

राज ठाकरेंच्या भूमिकेवर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच त्यांच्यावर टीकाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरेंनी उत्तर सभेची घोषणा केली होती. आता या उत्तर सभेत राज ठाकरे नेत्यांच्या टीकेवर उत्तर देताना दिसून आले आहे.

गुढी पाडव्याच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे एका नोटीशीत एवढे बदलतील याचं मला कौतूक आणि आश्चर्य वाटतं, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. आता या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे

एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? असे म्हणत राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, सुप्रिया सुळेंना काय बोलायचं नाही ओ, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, असेही राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंबाबत बोलताना म्हटले आहे.

तसेच राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांनीही टीका केली होती. मनते हा विझत चालेल्या लोकांचा पक्ष आहे. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती. आता राज ठाकरेंनी त्याला उत्तर दिलं आहे.

हे म्हणतात संपलेल्या-विझत चाललेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार, येऊन बघा हा काय संपत चाललेला पक्ष आहे का? हा विझलेला पक्ष नाही, तर समोरच्याला विझवणारा पक्ष आहे, असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांना दिले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा उल्लेख जंत पाटील म्हणून केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
क्रुर पती! हुंड्यात म्हैस मिळाली नाही म्हणून पत्नीचा चाकू भोकसून खून, मृतदेहापशी रडत बसली मुलं
पुण्याच्या अभिषेकचे सेकंड हॅन्ड इलेक्ट्रिक कार घेतल्यानंतर फायदा झाला की नुकसान? वाचा अनुभव
VIDEO : ‘या’ व्यक्तीमुळे फेमस झाला ‘आई कुठे काय करते?’ मधला अनिरुद्ध, मिलिंद गवळींनी केला खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now