Share

राज ठाकरेंवर ‘या’ भाषणांमुळे होतायत भूमिका बदलाचे आरोप, वाचा आधीच्या भाषणात नक्की काय होतं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यावरुन राज ठाकरेंवर राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. (raj thackeray changing their opinions)

गुढीपाडव्याच्या त्या सभेनंतर राज ठाकरेंनी टीकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी उत्तर सभा घेतली. यावेळीही त्यांनी आपली भोंग्यांबाबतची भूमिका ठाम असल्याचे म्हटले होते. पण यावेळीही राज ठाकरेंवर भूमिका बदलाचे आरोप करण्यात आले आहे. पण हा आरोप का होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज आपण त्याच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत…

ठाण्यातील सभेत पवारांवर घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली होती. तसेच त्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीची आठवणही करुन दिली होती. त्यामुळे भुतकाळात कोणाची भूमिका काय होती आणि वर्तमानकाळात कोणाची भूमिका काय आहे? यावरुन राज्याचं राजकारण चर्चेत आलं आहे.

यंदाच्या सभेत राज ठाकरे यांनी ईडीबाबत कोणतेही मोठे वक्तव्य केले नव्हते. पण २०१९ मध्ये झालेल्या गोरेगावच्या सभेत त्यांनी ईडीबाबत एक हैराण करणारे वक्तव्य केले होते. निवडणूकांच्यावेळी चौकशी मागे लावणार, ज्यांना अशा धमक्या दिले गेले ते भाजपमध्ये गेले असे, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. तर यावेळीच्या सभेत त्यांनी ईडीबाबत बॅकफूटवरची भूमिका घेतली आहे.

यावेळीच्या सभेत राज ठाकरेंनी बोलताना समान नागरी कायद्याबाबत भाष्य केले होते. त्यांनी समान नागरी कायद्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पण त्याआधी जेव्हा त्यांनी जे भाष्य केले होते, ते हैराण करणारंच होते. ३७० कलम, राम मंदिर, समान नागरी कायदा हे फक्त लक्षं हटावं यासाठी केलं जातं, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

मनसेचा झेंडा बदण्याआधीही अनेकदा राज ठाकरेंनी हिंदूत्वावर उघडपणे भूमिका मांडली होती. पण त्यांच्या आधीच्या भाषणातले मुद्दे आणि आताच्या भाषणातले मुद्यांमध्ये खुप फरक दिसून येतो. २०१४ च्या भाषणात त्यांनी रोजगार, बुलेट ट्रेन, खड्डे, पाणी, कायदा, नदी प्रदुषण, परप्रांतीय मुद्यांवर भाष्य केले होते. पण यावेळीच्या भाषणात ते मशीद, भोंगा, समान नागरी कायदा मुद्यांवर बोलताना दिसून आले होते.

महत्वाच्या बातम्या-
प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री? काय म्हणाले आंबेडकर वाचा
गोरं बाळ जन्माला येण्यासाठी सानिया मिर्जाने केलं होतं हे काम, स्वत: पती शोएब मलिकने केला खुलासा
तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही, नाहीतर…; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now