Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर सरकून टीका केली. राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर आणि महाराष्ट्रात घडून आलेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच लोकांसमोर येत जाहीर भाषण केले. त्यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांचे नियुक्ती केली. त्याच अंबादास दानवेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘राज ठाकरे भाजपची तळी उचलत आहेत. भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट ते वाचत आहेत,’ अशा शब्दात अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, ‘भाजपचे प्रवक्ते राज ठाकरे यांनी काही विधाने केली आहेत. ती पाहता ईडी चौकशी आधी आणि नंतर राज ठाकरेंच्या बोलण्यात मोठा फरक जाणवतो. आता ते भाजपचे प्रवक्ते झाले आहेत, असं म्हणत दानवेंनी राज ठाकरेंवर घणाघाती आरोप केले.
पुढे ते म्हणाले, ‘बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय, असं राज ठाकरे बोलले. मात्र खरंतर उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर दानवे बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, ‘महाविकास आघाडीने कोरोना महामारीचा सामना अगदी सहज केला. आता गद्दारांच्या महामारीला पण चोख प्रतिउत्तर देणार. आदित्य ठाकरेंच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय. उद्धव ठाकरे पण गणेशोत्सवानंतर दौऱ्यावर निघणार आहेत, असे दानवेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान राज ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणात ‘ज्याचे अधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री हे भाजप- सेनेत खूप आधीपासून ठरले आहे. मग २०१९ ला मुख्यमंत्रीपद मागितलंच कसं?’ असा सवाल उद्धव ठाकरेंना केला. अशा प्रकारच्या सर्व आरोपांवर आता शिवसेनेने भाष्य केले. त्यावर राज ठाकरेंकडून याबाबत कोणती प्रतिक्रिया येते? हे पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
Ajit Pawar : अजितदादांच्या रागापुढे भाजपचे सगळे मंत्री पडले गार, एकाने तर सभागृहातून ठोकली धूम
VIDEO: भर रस्त्यात गाडी अडवून मंत्र्यावर चाकूने हल्ला, हल्ला करण्यापुर्वी वाचली कुराण अन्…
BJP leader: भाजप नेत्याच्या गाडीतून तब्बल ४०० किलो गांजा जप्त; भाजप नेता म्हणतो, हे तर…