लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघेंचे अनेक किस्से आहेत. त्या किस्स्यांची अनेकदा चर्चाही होत असते. पण आता त्यांच्या जीवनप्रवासावर चित्रपट आला आहे. धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (raj thackeray anand dighe conversation)
या चित्रपटामुळे आनंद दिघे यांचे अनेक किस्से समोर येत आहे. अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
आता एका ट्विटर हँडलवरुन राज ठाकरे आणि आनंद दिघेंचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत आनंद दिघे हे रुग्णालयात असून तिथे बेडवर आहेत. त्यावेळी तिथे राज ठाकरेही आहे. या फोटोला एक कॅप्शनही देण्यात आले आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे- धर्मवीर. धर्मवीर आनंद दिघे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यातील हॉस्पिटलमधील शेवटचा संवाद, असे कॅप्शन त्या फोटोला देण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील एक सीनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे. ❤ pic.twitter.com/NdG2jx6bDl
— सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar) May 14, 2022
या चित्रपटाचा पहिला खास शो १३ मे रोजी पार पडला. ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये या शोचे स्क्रीनिंग झाले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल-ताशा पथकात सर्वांचे स्वागत करण्यात आले. तसेच आनंद दिघेंच्या कटआऊटचा दुग्धाभिषेक करण्यात आला होता.
दरम्यान, धर्मवीर चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. १.७५ ते १.९० कोटी रुपये या चित्रपटाने कलेक्शन केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच १० कोटींचा टप्पा पार पाडेल, असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
भाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाची सुप्रीम कोर्टाने केली सुटका, १० वर्षांची शिक्षा केली रद्द; कारण वाचून धक्का बसेल
सोहेल खानसोबत संसार मोडणारी सीमा खान आहे मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूची मेहुणी, जाणून घ्या
बाॅलीवूडबाबतच्या वक्तव्यावर कंगनाचा सपशेल यु टर्न; आता महेशबाबूला पाठींबा देत म्हणाली…